नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) या संकटकाळात गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीची किंमत (Gold and Silver Price) मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मार्चनंतर ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.
डॉलरचे (US Dollar)वधारलेले मुल्य आणि कमजोर झालेल्या जागतिक अर्थव्यवस्थेमुळे (Global Economy) बाजारात अनिश्चितता आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचांदीबरोबर प्लॅटिनमचे दर देखील उतरले आहेत. याच कारणाममुळे सोन्याची मागणी (Gold Demand) कमी झाली आहे. कोव्हिड-19 च्या वाढत्या संक्रमणामुळे आर्थिक रिकव्हरीचा अंदाज देखील कमजोर होऊ लागला आहे, विशेषत: युरोपमध्ये.
डॉलरमध्ये तेजी कायम राहण्याचे संकेत
गेल्या आठवड्यात सोन्याचे दर 4.6 टक्क्यांनी कमी झाले आहेत. तर चांदी 15 टक्क्यांनी घसरली आहे. जाणकारांच्या मते डॉलरमध्ये आलेली तेजी सोन्याच्या किंमतीवर विशेष परिणाम करत आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, अन्य चलनांच्या तुलनेत डॉलरमध्ये गेल्या सहा महिन्यातील सर्वाधिक तेजी पाहायला मिळेल.
(हे वाचा-कन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख)
अमेरिकन अर्थव्यवस्था एकट्याने सावरू शकत नाही फेड रिझर्व्ह
सोन्याच्या किंमतीमध्ये झालेली वाढ महागाई (Inflation) घटवण्यात मदत करतात. मात्र आता उपभोक्ता मुल्य वाढल्यामुळे आता सोन्याच्या किंमतीला मोठा धक्का बसला आहे. यूएस फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की केंद्रीय बँक एकट्याने अर्थव्यवस्थेचे निराकरण करू शकत नाही. कोरोनाच्या आकडेवारीत वाढ झाल्याने महागाईची भीती वाढली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आता सोन्याच्या दरावर झाला आहे.
(हे वाचा-चेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो? RBI घेऊन येतंय नवीन सुविधा)
प्लॅटिनमचे दरही उतरले
अमेरिकन सिनेट आता 2.5 लाख कोटी डॉलरच्या पुढील स्टिम्युलस पॅकेजवर काम करत आहे. यासंदर्भातील विधेयक पुढील आठवड्यातच मंजूर होऊ शकते. सोने आणि चांदी व्यतिरिक्त प्लॅटिनमच्या किंमतीतही मोठी घसरण नोंदविली जात आहे. राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लक्षात घेता, गुंतवणूकदार आता सावध दिसत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका आणि भौगोलिक-राजकीय तणाव यामुळे आर्थिक अनिश्चितता कायम राहील.
देशांतर्गत बाजारात घसरण कायम
देशांतर्गत बाजाराबाबत बोलायचे झाल्यास, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोन्याची वायदे किंमत (Gold Future) 238 रुपयांनी कमी होऊन दर 49,666 रुपये प्रति तोळावर आले होते. तर चांदीची वायदा किंमत देखील 1 टक्क्यांनी उतरली आहे. यानंतर चांदी 59,018 रुपये प्रति किलोग्रामवर आली आहे. एकूण आठवडाभरामध्ये सोन्याच्या दरात 2000 रुपये प्रति तोळा घसरण झाल्याचे दिसते. तर चांदीचे भाव जवळपास 9000 रुपये प्रति किलोने उतरले आहेत.