Home /News /money /

चेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो? RBI घेऊन येतंय नवीन सुविधा, वाचा कधी होणार लागू

चेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो? RBI घेऊन येतंय नवीन सुविधा, वाचा कधी होणार लागू

चेक पेमेंटवेळी होणारे फ्रॉड टाळण्यासाठी आरबीआय 1 जानेवारी 2021 पासून काही नव्या गाइडलाइन्स जारी करणार आहे. पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Pay System) अंतर्गत चेक पेमेंटसाठी काही गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक राहील

    नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : बँकिंग फ्रॉड पूर्णपणे बंद व्हावेत याकरता आरबीआय (Reserve Bank of India) नेहमी प्रयत्नशील असते. दरम्यान 1 जानेवारी 2021 पासून आरबीआय याकरता एक नवीन सिस्टम लागू करणार आहे. आरबीआयच्या या नव्या योजनेचं नाव 'पॉझिटिव्ह पे सिस्टम' (Positive Pay System) असणार आहे. याअंतर्गत चेक पेमेंटच्या  (Cheque Payment)माध्यमातून 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेसाठी काही माहिती पुन्हा एकदा कन्फर्म करावी लागेल. हे खातेधारकावर असेल की त्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे की नाही. मात्र अशी शक्यता देखील आहे की 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे चेक पेमेंट करायचे असल्यास ही योजना अनिवार्य केली जाईल. कसे काम करेल पॉझिटिव्ह पे सिस्टम? या सुविधेअंतर्गत, जी व्यक्ती चेक जारी करेल त्या व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चेकची तारीख, लाभार्थीचे नाव, प्राप्तकर्ता (Payee) आणि पेमेंटची रक्कम याबाबत पुन्हा एकदा माहिती द्यावी लागेल. चेक जारी करणारी व्यक्ती ही माहिती एसएमएस, मोबाइल App, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देऊ शकतो. (हे वाचा-मोठी बातमी! आता वीज स्मार्ट मीटर बसवणे गरजेचे, सरकार आणतंय नवीन नियम) यानंतर पेमेंटआधी ही सर्व माहिती तपासून पाहिली जाईल. जर यामध्ये काही गोंधळ असल्यास हा व्यवहार 'चेक ट्रंकेशन सिस्टम' (CTS - Cheque Truncation System) अंतर्गत मार्क करून याबाबत ज्या बँकेतून पैसे दिले जाणार आहेत आणि ज्या बँकेत पैसे जमा होणार आहेत त्यांना माहिती दिली जाईल. आरबीआयने अशी माहिती दिली आहे अशा परिस्थितीत योग्य पावलं उचलली जातील. पॉझिटिव्ह पे सिस्टमसाठी सीटीएसमध्ये नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI)नवीन सुविधा देखील विकसीत केली जाईल. सर्व बँकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. लोकांमध्ये जागरूकता पसरवणे आवश्यक आरबीआयने अशी माहिती दिली आहे की पॉझिटिव्ह पे सिस्टम 1 जानेवारी 2021 पासून लागू केली जाईल. त्याचप्रमाणे बँकांना असा सल्ला देण्यात आला आहे की, या नवीन फीचरबाबत ग्राहकांना संपूर्ण माहिती देण्यात यावी. (हे वाचा-रिलायन्स रिटेलला 1.75 टक्के समभागांसाठी Silver lake कडून मिळाले 7500 कोटी) त्यांच्यामध्ये याबाबत जागरूकता असणे गरजेचे आहे. बँक हे काम एसएमएस अलर्ट, शाखेमध्ये नोटीस लावणे, एटीएम, वेबसाइटवर माहिती देणे आणि इंटरनेट बँकिंगच्या साहाय्याने पूर्ण करेल. या निर्णयामुळे असुरक्षित पेमेंटची भीती राहणार नाही.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या