या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षात एका खात्यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतील. एका आर्थिक वर्षासाठी कमीत कमी रक्कम 250 रुपये आहे. जर एखाद्या व्यक्तीने या खात्यामध्ये चुकून दीड लाखापेक्षा अधिक रक्कम जमा केली तर ती व्याजासाठी मोजली जाणार नाही. त्याचप्रमाणे ही रक्कम डिपॉझिटर्सच्या खात्यामध्ये जमा केली जाते. या खात्यात 15 वर्षापर्यंत डिपॉझिट करता येते. एका खात्यात 15 वर्षापर्यंत डिपॉझिट केले जाऊ शकते.
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये यावेळी 7.6 टक्के दराने व्याज मिळते आहे. या योजनेमध्ये खाते उघडताना जे व्याज असते, त्याच दराने संपूर्ण गुंतवणुकीच्या काळात व्याज मिळते. सरकारने पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटसह सर्व स्मॉल सेव्हिंग स्कीम (Small Saving Schemes) साठी करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी मिळणाऱ्या व्याजात बदल केले नाही आहेत.
सध्याच्या व्याजदराच्या हिशोबाने जर प्रत्येक आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये 15 वर्षापर्यंत जमा केले, तर तुम्ही जमा केलेली एकूण रक्कम 22,50,000 रुपये होईल आणि त्यावर मिळणारे व्याज 41,36,543 रुपये होईल. 21 वर्षांनी ही योजना मॅच्यूअर होईल. जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत राहील. 21 वर्षांंनी ही रक्कम व्याजासह वाढून 64 लाख रुपये होईल. या योजनेत मिळणारे व्याज सरकार प्रत्येक तिमाहीमध्ये निश्चित करते. .