• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत आज तेजी, काय आहे प्रति तोळाचा आजचा भाव

Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत आज तेजी, काय आहे प्रति तोळाचा आजचा भाव

Gold-Silver Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये आज किरकोळ तेजी पाहायला मिळाली आहे. असे असले तरीही रेकॉर्ड हायपेक्षा सोन्याच्या किंमती अत्यंत कमी आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 जुलै: सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये आज किरकोळ तेजी (Gold-Silver Price Today) पाहायला मिळाली आहे. इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये आज सोन्याच्या किंमतीत सुरुवातीला तेजी पाहायला मिळाली. आज एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याचे दर 0.44 टक्क्यांनी वधारले आहेत. या वाढीनंतर सोन्याचे दर प्रति तोळा 47,788 रुपये झाले आहेत. तर चांदीच्या दरात Silver Price) 1.24 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर चांदीचे दर प्रति किलो 67,210 रुपयांवर पोहोचले आहेत. रेकॉर्ड स्तरापेक्षा स्वस्त आहेत सोन्याचे दर मागील वर्षी 2020 मध्ये ऑगस्ट महिन्यात MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा दर जवळपास 56,200 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर होता. तर आज MCX नुसार, सोनं 47,788 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. मागील वर्षीच्या उच्चांकी पातळीवरुन सोने दर अद्याप 8,412 रुपये स्वस्त आहे. सोन्याचांदीचा आजचा भाव एमसीएक्सवर सोन्याचे दर 0.44 टक्क्यांनी वाढल्यामुळे 47,788 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 01.24 टक्क्यांच्या वाढीमुळे  67,210 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर पोहोचले आहेत. हे वाचा-LIC च्या या योजनेत एकदाच पैसे गुंतवून दरमहा मिळवा 12000 रुपये, मिळतील हे 6 फायदे मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही  www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. हे वाचा-Ration Card आहे महत्त्वाचा दस्तावेज, वाचा कशाप्रकारे बनवाल नवीन कार्ड? सोनं शुद्ध आहे हे कसं ओळखाल? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: