लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या किंमतीने गाठला उच्चांक, इथे पाहा आठवड्याच्या पहिल्या दिवशीचे दर

लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या किंमतीने गाठला उच्चांक, इथे पाहा आठवड्याच्या पहिल्या दिवशीचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमती आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर पोहोचल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मे : आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमती आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर पोहोचल्या आहेत. शुक्रवारी सोन्याची किंमत प्रति तोळा 47067 रुपयांच्या ऐतिहासिक स्तरावर पोहोचली होती. आता यामध्ये 881 रुपयांनी वाढ होऊन प्रति तोळा सोन्याची किंमत (Gold rates today) 47,948 रुपये इतकी झाली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे देशभरातील सराफा बाजार बंद आहेत. मात्र इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर (ibjarates.com) सोन्याची सरासरी किंमत अपडेट होत असते.

तज्ज्ञांच्या मते कोरोना व्हायरच्या (Coronavirus) वाढत्या संक्रमणाचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. त्याचप्रमाणे अमेरिका आणि चीनमध्ये वाढत्या तणावामुळे शेअर बाजारात घसरण झाली आहे. त्याचा देखील मोठा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे.

(हे वाचा-चीनमधून बाहेर पडली ही जर्मन कंपनी, भारतात सुरू करणार व्यवहार)

99.9 टक्के शुद्धता म्हणजेच 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 881 रुपयांनी वाढून प्रति तोळा 47948 रुपये इतक्या झाल्या आहेत. त्याचप्रमाणे एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याच्या किंमती सोमवारी 275 रुपयांनी वाढल्या. याठिकाणी सोन्याचे दर 47,656 रुपये प्रति तोळा झाले आहेत. त्याचप्रमाणे एमसीएक्सवर चांदीचे भाव 3 टक्क्यांनी वाढल्यामुळे चांदी 48,053 प्रति किलोग्राम झाली आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर चांदी 2,586 रुपयांनी महागली होती. एचडीएफसी सिक्यूरीटीजच्या मते लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवल्यामुळे तोपर्यंत सराफा बाजार देखील बंद राहतील.

(हे वाचा-Lockdown 4 मध्ये धावणार केवळ या ट्रेन, तिकिट बुक करण्याआधी वाचा हे नियम)

आंतरराष्ट्रीय बाजारातही ऑक्टोबर 2012 नंतर आज सोन्याचे दराने उच्चांक गाठला आहे. अमेरिका आणि  चीनमधील व्यापार युद्धाची चिंता आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेत आलेली मंदी या कारणांमुळे सोन्याचे भाव वधारले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती 1756.79 डॉलर प्रति औंस झाल्या आहेत.  सोन्याची वायदा किंमतही अर्ध्या टक्क्यांनी वाढून 1765.70 डॉलर प्रति औंसवर आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: May 18, 2020, 2:15 PM IST

ताज्या बातम्या