Lockdown 4 मध्ये धावणार केवळ या ट्रेन, तिकिट बुक करण्याआधी वाचा हे नियम

Lockdown 4 मध्ये धावणार केवळ या ट्रेन, तिकिट बुक करण्याआधी वाचा हे नियम

भारतीय रेल्वे लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये (Lockdown 4) श्रमिक स्पेशल ट्रेन (Shramik Special), काही विशेष रेल्वे, पार्सल सेवा आणि मालगाड्या चालवण्यात येणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मे : भारतीय रेल्वे लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये (Lockdown 4) श्रमिक स्पेशल ट्रेन (Shramik Special), काही विशेष रेल्वे, पार्सल सेवा आणि मालगाड्या चालवण्यात येणार आहेत. सरकारने चौथ्या टप्प्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला आहे. भारतीय रेल्वेच्या सर्व नियमित ट्रेन्स (Passengers Trains) 30 जूनपर्यंत धावणार नाही आहेत. रेल्वेकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जे नियम होते त्याच नियमांचे पालन चौथ्या टप्प्यातही करण्यात येणार आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 4 मे ते 17 मे पर्यंत होता. आजपासून चौथ्या टप्प्यास सुरूवात झाली आहे.

15 स्पेशल ट्रेन धावणार

देशामध्ये 25 मार्चपासून लागू झालेल्या लॉकडाऊनच्या सर्व चरणांमध्ये पार्सल सेवा आणि मालगाड्यांचे संचालन सुरू होते. त्यानंतर प्रवासी मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पाठवण्यासाठी रेल्वेने 1 मेपासून श्रमिक स्पेशल रेल्वे सुरू केल्या.

(हे वाचा-'प्रवासी मजुरांबाबत राजकारण नको',अर्थमंत्र्यांचा राहुल, सोनिया गांधींवर हल्लाबोल)

तर सामान्य नागरिकांसाठी राजधानी एक्सप्रेसच्या मार्गावर निश्चित दिशादर्शकाअंतर्गत 15 स्पेशल रेल्वे गाड्यांची सेवा सुरू करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेचे प्रवक्ते आर. डी. वाजपेयी यांनी अशी माहिती दिली की, रेल्वेच्या परिचालनामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे. श्रमिक स्पेशल आणि 15 स्पेशल ट्रेन चालू राहणार आहेत. त्याचप्रमाणे पार्सल सेवा आणि मालगाड्या देखील चालू राहणार आहेत.

तिकिट बुकिंगचे नियम बदलले

भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) चालवण्यात येणाऱ्या स्पेशल ट्रेनचे बुकिंग करण्यासाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. रेल्वेची सबसिडिअरी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉरपोरेशन (IRCTC)च्या वेबसाइटवर राजधानी एक्सप्रेससारख्या (Rajdhani Express) स्पेशन ट्रेन्ससाठी बुकिंग होत आहे.

(हे वाचा-SBI अलर्ट! बँकेने ग्राहकांना पाठवला हा संदेश, दुर्लक्ष केल्यास होणार मोठं नुकसान)

स्पेशल ट्रेन आणि अन्य ट्रेनचे बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना याबाबत स्पष्ट करावे लागणार आहे की, ते ज्या राज्यामध्ये जात आहेत त्याठिकाणच्या क्वारंटाइन प्रोटोकॉल बद्दल अर्थात क्वारंटाइनसाठी काय खबरदारी घेण्यात येणार आहे किंवा काय नियम आहेत याबाबत माहिती आहे. त्यानंतरत तुम्हाला तिकीट बुकिंगची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. 14 मे रोजी दिल्लीहून बंगळुरूला गेलेल्या काही प्रवाशांनी क्वारंटाइन राहण्यास नकार दिल्यानंतर हा नियम करण्यात आला आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: May 18, 2020, 12:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या