मराठी बातम्या /बातम्या /मनी /

चीनमधून बाहेर पडली ही जर्मन कंपनी, भारतात सुरू करणार व्यवहार; नोकरीची संधी वाढण्याची शक्यता

चीनमधून बाहेर पडली ही जर्मन कंपनी, भारतात सुरू करणार व्यवहार; नोकरीची संधी वाढण्याची शक्यता

 कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान चीनमध्ये गुंतवणूक केलेल्या अनेक विदेशी कंपन्यांनी त्यांचे बस्तान हलवण्यास सुरूवात केली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 18 मे : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगभरातील अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान चीनमध्ये (China) गुंतवणूक केलेल्या अनेक विदेशी कंपन्यांनी त्यांचे बस्तान हलवण्यास सुरूवात केली आहे. आणि आशियामध्ये पुन्हा एकदा व्यवहार सुरू करण्यासाठी त्यांची भारताला पसंती आहे. दरम्यान जर्मन कंपनी असणाऱ्या वॉन वेल्स (von wellx) या कंपनीने देखील त्यांचा चीनमधीलल व्यवसाय बंद करून तो भारतात सुरू कऱण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी मूळ भारतीय असणाऱ्या लाव्हा (Lava) या कंपनीने देखील त्यांचा चीनमधील उद्योग बंद केला होता. आता वॉन वेल्स ही फुटवेअर बनवणारी कंपनी भारतात उद्योग थाटणार आहे.

वॉन वेल्स ही जर्मन कंपनी आग्र्यामध्ये त्यांचा नवीन प्रकल्प सुरू करणार आहे. यांसदर्भात कंपनीने लॅस्टीक इंटस्ट्रीजबरोबर करार केला आहे. फुटवेअर इंडस्ट्रीमध्ये वॉन वेल्सन ही अत्यंत नावाजलेली कंपनी आहे. हा कंपनीचा प्रकल्प भारतात सुरू झाल्यास ते फायद्याचे ठरेल. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कंपनी चीनमधील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेत आहे

(हे वाचा-Lockdown 4 मध्ये धावणार केवळ या ट्रेन, तिकिट बुक करण्याआधी वाचा हे नियम)

वॉन वेल्स या कंपनीचा असा दावा आहे की त्यांची उत्पादनं वापरल्याने पाय, कंबर आणि गुडघेदुघीपासून आराम मिळतो. त्यांची 80 देशांमध्ये कंपनीच्या उत्पादकांची विक्री होते, तर 10 लाख लोकं त्यांचे प्रोडक्ट्स वापरतात असाही दावा कंपनीने केला आहे. कंपनीचे 500 हून अधिक स्टोअर असून त्यांची इ-कॉमर्सच्या माध्यमातून देखील विक्री केली जाते.

केवळ ही फुटवेअर कंपनीच नव्हे तर आणखीही काही चीनमधील कंपन्या भारतामध्ये व्यवसाय सुरू करतील असा दावा जाणकारांकडून करण्यात येत आहे. परिणामी भारतात रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील अशी शक्यता नाकारता येत नाही

(हे वाचा- SBI अलर्ट! बँकेने ग्राहकांना पाठवला हा संदेश, दुर्लक्ष केल्यास होणार मोठं नुकसान)

संपादन - जान्हवी भाटकर

First published: