Home /News /money /

Gold Price Today: पुन्हा महागलं सोनं, तरी आहे सर्वोच्च स्तरापेक्षा 7,590 रुपयांनी स्वस्त; वाचा लेटेस्ट भाव

Gold Price Today: पुन्हा महागलं सोनं, तरी आहे सर्वोच्च स्तरापेक्षा 7,590 रुपयांनी स्वस्त; वाचा लेटेस्ट भाव

Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये शुक्रवारी तेजी पाहायला मिळते आहे. आज एमसीएक्सवर (MCX) सोन्यासह चांदीचे दरही वधारले आहेत.

    नवी दिल्ली, 16 जुलै: सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये  (Gold-Silver Price Today) शुक्रवारी तेजी पाहायला मिळते आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्यासह चांदीचे दरही (Silver price today) वधारले आहेत. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ऑगस्टच्या डिलिव्हरीचे सोन्याचे दर 0.23 टक्क्यांनी वधारले आहेत. तर चांदीच्या किंमतीत 0.40 टक्क्यांची वाढ झाली आहे. अजूनही रेकॉर्ड स्तरापेक्षा 7,590 रुपयांनी स्वस्त आहे सोनं गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये एमसीएक्सवर सोन्याचे भाव 56200 रुपये प्रति तोळाच्या आसपास होते. तर आज MCX वर सोनं 48,409 रुपये प्रति तोळावर आहे. अर्थात आज सोन्याचे दर प्रति तोळा 7,590 रुपयांनी स्वस्त आहेत. इथे तपासा सोन्याचांदीचे लेटेस्ट दर (Gold-Silver Price Today, 16 July 2021) मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.23 टक्क्यांनी वधारले आहेत. या वाढीनंतर सोन्याचे दर 48,409 रुपये प्रति तोळा झाली आहेत. तर चांदीच्या किंमतीतही आज झळाळी पाहायला मिळाली. चांदीमध्ये झालेल्या 0.40 टक्क्यांच्या वाढीनंतर चांदीचे दर 69,690 रुपये प्रति किलो झाले आहेत हे वाचा-Success Story: देशातील सर्वात मोठा IPO आणणारी कंपनी Paytm ची यशोगाथा आज आहे स्वस्त सोनेखरेदीची शेवटची संधी तुम्ही जर सोन्यामध्ये गुंतवणूक  (Investment in Gold) करण्यासाठी स्वस्त मार्ग शोधत असाल, तर सरकारची सॉव्हरेन होल्ड बाँड स्कीम (Sovereign Gold Bond scheme) तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.  12 जुलैपासून सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 ची चौथी सीरिज (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 – Series IV) सब्सक्रिप्शनसाठी खुली झाली असून आज शेवटचा दिवस आहे. विक्री 16 जुलैपर्यंत होणार आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या या सीरिजमधील सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 4,807 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सरकारच्या वतीने आरबीआय (Reserve Bank of India) सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond SGB) जारी करतं. तुम्ही जर गुंतवणूक करणार असाल तर जाणून घ्या सविस्तर माहिती. हे वाचा-नोकरी करणाऱ्यांना PNB देत आहे 3 लाखांचा लाभ, झिरो बॅलन्स असेल तरीही मिळतील पैसे कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today

    पुढील बातम्या