नवी दिल्ली, 15 जुलै: तुम्ही जर नोकरी करत असाल तर पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) तुम्हाला एक खास सुविधा देत आहे. पीएनबी नोकरदार वर्गातील ग्राहकांना तीन लाखांची विशेष सुविधा देत आहे. ही सुविधा मिळवण्यासाठी तुम्हाला पंजाब नॅशनल बँकेत माय सॅलरी खातं (PNB MySalary Account) सुरू करावं लागेल. हे खातं 4 कॅटेगरीमध्ये देण्यात येत आहे- सिल्वर, गोल्ड, प्रीमियम आणि प्लॅटिनम. हे खातं तुमच्या पे स्केलच्या हिशोबाने उघडण्यात येईल. जाणून घ्या सविस्तर
या खात्याअंतर्गत ग्राहकांना 20 लाख रुपयांपर्यंतची मोफत विमा सुविधा देण्यात येत आहे. 10 हजार ते 25 हजार रुपये पगार असणाऱ्यांचे खाते सिल्ह्वर कॅटेगरीमध्ये येईल. याशिवाय 25001 रुपयांपासून 75000 रुपये पगार असणाऱ्यांना गोल्ड कॅटेगरीमध्ये खातं उघडता येईल. 75001 रुपये ते 150000 रुपये पगार असणारे प्रीमियम आणि 150001 रुपयांपेक्षा जास्त पगार असणारे प्लॅटिनम कॅटेगरीमध्ये खातं मिळेल.
हे वाचा-मास्टरकार्डवरील RBI च्या कारवाईनंतर या बँकेकडून दिलासा; देणार VISA Credit Card
PNB ने ट्वीट करत दिली माहिती
पीएनबीने याबाबत एक ट्वीट केलं आहे त्यात असं म्हटलं आहे की, 'तुमचा पगार चांगल्या पद्धतीने मॅनेज करू इच्छित आहात? तर PNB MySalary Account उघडा. याशिवाय वैयक्तिक अपघात विमा आणि यासह ओव्हरड्राफ्ट आणि स्वीप सुविधा मिळवा'.
3 लाखाची ओव्हरड्राफ्ट सुविधा
तुम्ही हे खातं झिरो बॅलन्स सुविधेसह उघडू शकता. याशिवाय यामध्ये मिनिमम क्वार्टरली अॅव्हरेज बॅलन्स देखील झिरो आहे. याशिवाय ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी देखील मिळते आहे. सिव्ह्वर कॅटेगरीत असणाऱ्यांना 50 हजारांची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मिळते. याशिवाय गोल्ड कॅटेगरीत असणाऱ्यांना 150000 रुपये, प्रीमियम कॅटेगरी असणाऱ्यांना 225000 आणि प्लॅटिनम केटेगरी असणाऱ्यांना 300000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळेल. या सुविधेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही https://www.pnbindia.in/salary-saving-products.html या लिंकवर भेट देऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pnb, Pnb bank, Punjab national bank