Home /News /money /

ATMमधून पैसे काढणे आणि बचत खात्यात रक्कम ठेवण्याबाबत आजपासून बदलणार हे नियम

ATMमधून पैसे काढणे आणि बचत खात्यात रक्कम ठेवण्याबाबत आजपासून बदलणार हे नियम

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती की एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क आणि बचत खात्यामध्ये कमीतकमी रक्कम नसल्यास आकारण्यात येणारा दंड या दोन्हींवर 3 महिन्यांसाठी सूट देण्यात आली आहे. ही सूट 30 जून रोजी संपली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 01 जुलै : कोरोनाच्या संकटकाळात देशभरात लॉकडाऊनची (Coronavirus Lockdown) घोषणा झाल्यानंतर 24 मार्च 2020 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala  Sitharaman) यांनी घोषणा केली होती की एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क (ATM Charges) आणि बचत खात्यामध्ये कमीतकमी रक्कम नसल्यास (Minimum Balance) आकारण्यात येणारा दंड या दोन्हींवर 3 महिन्यांसाठी सूट देण्यात  आली आहे. त्यामुळे ग्राहकांना कितीही वेळा एटीएमधून पैसे काढण्याची मुभा मिळाली होती त्याचप्रमाणे मोठ्या ट्रान्झॅक्शनवर अतिरिक्त टॅक्स देखील द्यावा लागत नव्हता. कोरोनाच्या संकटात नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान या दोन्ही सूट 30 जून रोजी संपल्या आहेत. खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स नसल्यास होणार दंड देशातील प्रत्येक बँकेच्या नियमानुसार काही ठराविक रक्कम मिनिमम बॅलेन्स म्हणून खात्यामध्ये ठेवावी लागते. ही रक्कम खात्यामध्ये नसल्यास ग्राहकांना दंड भरावा लागतो. केंद्र सरकारकडून यामध्ये 3 महिन्यासाठी सूट दिली होती. 30 जून रोजी ही सूट संपल्यानंतर ती पुढे वाढवण्यासाठी सरकारकडून कोणती घोषणा करण्यात आली नाही आहे. प्रीमियम खात्यासाठी जास्त मिनिमम बॅलेन्स सेव्हिंग खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स प्रत्येक बँकानुसार वेगळी रक्कम असते. आता काही बँकांमध्ये 5000 ते 10000 मिनिमम बॅलेन्स ठेवणे अनिवार्य होऊ शकते. (हे वाचा-आजपासून बदलणार हे 10 महत्त्वाचे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम) दरम्यान प्रीमियम खात्यासाठी ही रक्कम अधिक देखील असू शकते. हिताची पेमेंट सर्व्हिसचे एमडी आणि सीईओ (Cash Business) रुस्तम ईराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने दिलेला हा सूट देण्याचा निर्णय योग्य होता, मात्र ही सूट वाढवण्याचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नाही आहे. ATM ट्रान्झॅक्शन संबधित हा नियम बदलणार लॉकडाऊन लागू झाल्यानंतर केंद्र सरकारने एटीएमधून पैसे काढताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर सूट दिली होती. 3 महिन्यासाठी कोणत्याही बँकेच्या एटीएममधून विनाशूल्क रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली होती. (हे वाचा-जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मोठा झटका, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढले) यासाठी 30 जून 2020 ही डेडलाइन आहे. त्यामुळे 1 जुलैपासून ठराविक ट्रान्झाक्शननंतर तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासासाठी ठराविक रक्कम द्यावी लागणार आहे. साधारणपणे कोणतीही बँक एका महिन्यात 5 वेळा फ्री ट्रान्झॅक्शन करण्याची परवानगी देते. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून 3 वेळा विनाशूल्क रक्कम काढता येते. या मर्यादेनंतर बँका अतिरिक्त 8 ते 20 रुपयांचे शूल्क आकारतात. संपादन - जान्हवी भाटकर
    First published:

    Tags: ATM

    पुढील बातम्या