नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर: सध्या लग्नसराईच्या काळ सुरू झाला आहे. या दरम्यान सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने चढ-उतार सुरूच आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. कारण सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीत सोन्याची मोठी विक्री झाल्याची तज्ज्ञांची माहिती आहे. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झाली आहे. अशा स्थितीत सोन्या-चांदीच्या किमतींना मागणी वाढल्याने आधार मिळतो. सोने पुन्हा एकदा हळूहळू 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दिशेने वाटचाल करत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.11 टक्क्यांनी वाढला आहे. तर चांदीचे भाव 0.50 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. जाणून घ्या काय आहे सोन्या-चांदीचा भाव डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.11 टक्क्यांनी घसरून 49,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे आज चांदी 0.50 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 66,895 रुपये आहे. हे वाचा- Digital Gold बाबत मोठ्या निर्णयाच्या विचारात सरकार, SEBI आणि RBI आखत आहेत योजना मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. **हे वाचा-** इंधनाचे लेटेस्ट दर जारी, आज 1 लीटर पेट्रोल-डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार? अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.