मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Digital Gold बाबत मोठ्या निर्णयाच्या विचारात सरकार, SEBI आणि RBI बनवतायंत मास्टर प्लॅन

Digital Gold बाबत मोठ्या निर्णयाच्या विचारात सरकार, SEBI आणि RBI बनवतायंत मास्टर प्लॅन

सरकार आता डिजिटल गोल्डच्या ट्रेडिंगवर कठोर पावलं उचलणार आहे, जेणेकरून गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहतील. डिजिटल गोल्ड कोणत्या रेग्युलटरीच्या अंतर्गत येत नसल्याने यात व्यवहार करणं सुरक्षित नाही आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर: डिजिटल गोल्डच्या ट्रेडिंगबाबत (Digital Gold Update News) दीर्घकाळापासून विवाद सुरू आहे. मार्केट रेग्युलेटर सेबीने एक्सचेंजेसमध्ये ब्रोकर्सच्या माध्मयातून डिजिटल गोल्डच्या विक्रीवर निर्बंध आणले आहेत. डिजिटल गोल्डची विक्री सिक्योरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स नियमांचे उल्लंघन असल्याचं सेबीचं म्हणणं आहे. सिक्योरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रुल्सच्या मते डिजिटल गोल्डला सिक्योरिटी मानता येणार नाही. सेबीच्या या निर्णयामुळ नॉन-बँकिंग प्लॅटफॉर्म्स किंवा वॉलेट्समधून डिजिटल गोल्डचे ट्रेडिंग वाढले आहे...

दरम्यान सरकार आता डिजिटल गोल्डच्या ट्रेडिंगवर कठोर पावलं उचलणार आहे, जेणेकरून गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहतील. डिजिटल गोल्ड कोणत्या रेग्युलटरीच्या अंतर्गत येत नसल्याने यात व्यवहार करणं सुरक्षित नाही आहे. सरकार आता हीच परिस्थिती बदलून डिजिटल गोल्ड रेग्युलेटरीच्या कक्षेत आणण्याचा विचार करत आहे. अर्थ मंत्रालय, सेबी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया क्रिप्टोकरन्सीसह काही नियामक निरिक्षणाअंतर्गत डिजिटल गोल्ड देखील आणण्याचा विचार करत आहेत. डिजिटल गोल्ड किंवा क्रिप्टोकरन्सी यामधून होणारा बेसुमार नफा बाजारासाठी घातक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हे वाचा-अबब! कृषी मेळाव्यात तब्बल 1 कोटींचा बैल, एवढ्या किंमतीमागे आहे मोठं कारण

सरकारची अशी योजना आहे की या ट्रेडिंगना रेग्युलेटरी अंतर्गत आणून त्यात पारदर्शकता आणली जावी आणि कंपन्यांद्वारे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी या संपत्तीमध्ये केल्या जाणाऱ्या मोठ्या रिटर्नच्या खोट्या आश्वासनांवर अंकूश लावता येईल. डिजिटल सोने सुरक्षिततेच्या नियमांखाली आणण्यासाठी सेबी कायदा आणि सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन कायद्यात सुधारणा करण्याची सरकारची योजना आहे.

हे वाचा-Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण; काय आहेत नवे दर?

शनिवारी सेबीसह इतर नियामकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिप्टो मालमत्तेबाबत दीर्घकालीन धोरण ठरवण्यासाठी बैठक घेतली.

त्यानंतर, वित्तविषयक स्थायी समितीने क्रिप्टोशी निगडीत संधी आणि आव्हानांबद्दल त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी भागधारकांसोबत बैठक घेतली. गुंतवणूकदारांचा विशेषत: तरुण गुंतवणूकदारांचा डिजिटल सोन्याकडे कल झपाट्याने वाढत आहे. कारण मोबाइल आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा वॉलेटद्वारे ऑफर केलेल्या कॅशबॅक रिवॉर्ड्सद्वारे डिजिटल सोन्यात गुंतवणूक करता येते. याशिवाय तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये कितीही पैसे गुंतवू शकता. तुम्ही 100-200 रुपयांनाही सोने खरेदी करू शकता.

First published:

Tags: Gold, Gold bond, Gold prices today