Home /News /money /

सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ; इतिहासात पहिल्यांदाच सोन्याने गाठली एवढी उंची

सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ; इतिहासात पहिल्यांदाच सोन्याने गाठली एवढी उंची

सोन्याच्या किमतीत गेल्या दोन दिवसात जवळपास दहा ग्रॅममागे 1500 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे आणि चांदीचे आजचे दर इथे पाहा

    मुंबई, 6 जानेवारी : अमेरिका आणि इराण दरम्यानचा दणाव वाढल्यामुळे आणि युद्धजन्य परिस्थितीच्या भयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात तेजी आली. सोन्याच्या भावाने (Gold Price 6 January 2020) सोमवारी जोरदार उसळी घेतली आणि दहा ग्रॅममागे 720 रुपयांनी भाव चढला. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर (gold rate today) 10 ग्रॅमला 41,010 वरून 41,730 रुपये झाला. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा सोन्याचा दर 42125 रुपयांपर्यंत होता. चांदीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. चांदीमध्ये (gold and silver rate today) किलोमागे 1105 रुपयांची वाढ झाली. अमेरिकेने इराणचे लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी (Qasem Soleimani) यांच्यावर हल्ला करून हत्या केल्यानंतर युद्धाचे ढग गडद झाले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम जागतिक तेल बाजारावर झाला. त्याचे पडसाद सोन्याच्या किमतीवरही होत आहे. यावर्षीची आतापर्यंतची सर्वाधिक दरवाढ सोमवारी झाली. संबंधित - घरात ठेवलेल्या सोन्यावर आहे बँकांची नजर, मोदी सरकारचे नवे आदेश गेल्या दोन दिवसात सोनं दीड हजार रुपयांनी महागलं आहे. चांदीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. सोमवारी चांदीचे दर 48,325 रुपयांवरून वाढून 49,430 रुपये किलोवर पोहोचले. सोनं महागलं, हे आहे कारण सोनं आणि चांदी महागली आहे, त्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले चढे भाव हे कारण आहेच, पण त्याबरोबर देशांतर्गत परिस्थितीसुद्धा कारणीभूत आहे. अमेरिका आणि इराणमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याबरोबरच भारतीय रुपयाचं मूल्य डॉलरच्या तुलनेत कमी झाल्यानं त्याचा फटकाही सोन्याच्या किमतीला बसला आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 25 पैशांनी घसरली. एका डॉलरची किंमत 72.31 रुपयांवर पोहोचली आहे. भारतात सध्या लग्नसराईचे दिवस आहेत आणि सोन्याला स्थानिक बाजारपेठेतही जोरदार मागणी आहे. या सगळ्या कारणांमुळे सोन्याच्या दरात दीड हजारांनी वाढ झाली आहे. अन्य बातम्या कधीही न विसरणारा बर्थ डे! केकच्या डिझाईनवरून झालेल्या राड्यात गमावला मित्र असा आहे 'मनसे'चा नवा झेंडा, 23 जानेवारीला राज ठाकरे करणार मोठी घोषणा काँग्रेसला सोडून शिवसेनेनं हाती घेतलं कमळ, या जिल्ह्यात दिला भाजपला पाठिंबा  
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Gold, Gold rate

    पुढील बातम्या