जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / कधीही न विसरणारा बर्थ डे! केकच्या डिझाईनवरून बेकरीत झालेल्या राड्यात गमावला मित्र

कधीही न विसरणारा बर्थ डे! केकच्या डिझाईनवरून बेकरीत झालेल्या राड्यात गमावला मित्र

कधीही न विसरणारा बर्थ डे! केकच्या डिझाईनवरून बेकरीत झालेल्या राड्यात गमावला मित्र

धक्कादायक! केक घेण्यासाठी गेला अन् मित्राचा मृतदेह घेऊन परतला

  • -MIN READ
  • Last Updated :

चेन्नई, 06 जानेवारी : एकीकडे जगभरात 31 डिसेंबर रोजी नववर्षाचे स्वागत होत असताना, तमिळनाडूमध्ये मात्र एक धक्कादायक प्रकार घडला. चेन्नईमध्ये वाढदिवसाच्या केकवरून पाच लोकांनामध्ये झालेल्या वादात एकाची हत्या करण्यात आली आहे. बेकरीमध्ये एकाचा खून केल्याप्रकरणी चेन्नई पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. 31 डिसेंबर रोजी पुंथॉप कॉलनीतील रहिवासी असलेल्या कुमार आणि पुष्पराजन यांना एक टोळीने बेदम मारहाण केली. वाढदिवसाच्या केकची डिलेव्हरी करण्यास उशीर झाल्यामुळं बकेरीतील कर्मचाऱ्यांसोबत या दोघांचा वाद झाला. 31 डिसेंबर रोजी कुमारचा वाढदिवस होता. त्यासाठी त्यांनी बेकरीमध्ये केकची ऑर्डर दिली होती. मात्र केकची डिलेव्हरी उशीरा झाल्यामुळं कुमार आणि पुष्पराजन यांनी बेकरी कर्मचाऱ्यांना सुनावले. कुमारनं केकच्या डिझाईनबद्दलही राग व्यक्त केला होता. वाचा- पुण्यात 12 मजली इमारतीमध्ये भीषण आग, पाहा VIDEO पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार आणि पुष्पराजन दुचाकीवरून घरी परत जात असताना, इरियापिलई कुप्पमजवळ दहा जणांच्या टोळीने त्यांना थांबवले. टोळीतील लोकांनी कुमार आणि पुष्पराजन यांनी धारधार शस्त्रांनी हल्ला केला आणि त्यांना रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेतच रस्त्यावर सोडले. कुमार व पुष्पराजन यांना प्रकृती चिंताजनक असून त्यांना पोन्नेरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाचा- ‘मी प्रेग्नन्ट असेन तर…’, पत्रकारच्या प्रश्नावर दीपिका पदुकोण भडकली या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पुष्परजन यांना शासकीय स्टेनली रुग्णालयात हलविण्यात आले व तेथे शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कत्तूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी भरत (24), उमा भारत (21), प्रताप (18), अजित (23) आणि स्टालिन (23) यांना अटक केली आहे. पोसीस सध्या या पाचही जणांची चौकशी करत आहेत. तर, उर्वरित संशयितांना पकडण्यासाठी पोलिस मोहीम राबवित आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की आरोपी हल्लेखोर बेकरी कर्मचाऱ्याचे मित्र होते. वाचा- JNU: धक्कादायक खुलासा, हिंसाचारावेळी हल्लेखोरांनी वापरला कोडवर्ड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात