Home /News /money /

ऑगस्ट महिन्यात सोनेचांदी 8000 पेक्षा जास्त दराने झाले स्वस्त, वाचा आणखी किती घसरणार भाव

ऑगस्ट महिन्यात सोनेचांदी 8000 पेक्षा जास्त दराने झाले स्वस्त, वाचा आणखी किती घसरणार भाव

अमेकिकन डॉलरमध्ये (US Dollar) मोठ्या घसरणीनंतर आता पुन्हा एकदा सुधार पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम बुलियन मार्केट अर्थात सोन्या-चांदीच्या किंमतीवर होत आहे.

    नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह (US Central Bank Federal Reserve)ने अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरी संदर्भात सकारात्मक अपेक्षा व्यक्त केली आहे. अमेकिकन डॉलरमध्ये (US Dollar) मोठ्या घसरणीनंतर आता पुन्हा एकदा सुधार पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम बुलियन मार्केट अर्थात सोन्या-चांदीच्या किंमतीवर होत आहे. त्यामुळे 7 ऑगस्ट रोजी रेकॉर्ड स्तरावर गेल्यानंतर आता सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या किंमती कमी होण्याचे सत्र हे गेले काही दिवस सुरू आहे. या दरम्यान सोन्याचे भाव सर्वोच्च स्तरावरून 4200 रुपये प्रति तोळा तर चांदीचे भाव 8860 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते गेल्या दोन सत्रांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या घसरणीचे मोठे कारण अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह बँकेचे Meeting Minutes आहेत. या Meeting Minutes मधून असे संकेत मिळाले आहेत की, 18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या केंद्रीय बँकेच्या बैठकीत व्याजदरामध्ये कमतरता जारी राहणार आहे. (हे वाचा-RBI ची गारंटीड नफ्याची योजना! 1000 रुपयांपासून करा श्रीगणेशा) शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे भाव 53,084 रुपये प्रति तोळावरून 52,990 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर मुंबईमध्ये 99.9 टक्के सोन्याचे भाव घसरून 52390 रुपये प्रति तोळावर आले आहेत. एसकोर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांच्या मते, येणाऱ्या काही दिवसात सोन्याच्या किंमती आणखी उतरणार आहेत. त्यांच्या मते अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर देखील होणार आहे. त्याचप्रमाणे गुंतवणुकदारांनी पुन्हा एकदा शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. ऑगस्टमध्ये किती उतरले सोन्याचे दर? ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोन्याचे भाव 2302 रुपये प्रति तोळा तर चांदी 10243 रुपये प्रति किलोने महागा झाली होती. याचे महत्त्वाचे कारण कोरोनाचे वाढते संक्रमण आणि शेअर बाजारातील अनिश्चितता हे होते. 3 ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव 53976 रुपये प्रति  तोळाच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचले होते. या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी 7 ऑगस्ट रोजी सोने सर्वोच्च शिखरावर पोहोचले होते. यादिवशी सोन्याचे दर 56126 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. चांदीचे दर यादरम्यान 64770 रुपये प्रति किलोवरून 75013 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. (हे वाचा-तुमच्या बँक खात्यावर आहे हॅकर्सची नजर, फसवणूक टाळण्यासाठी वाचा SBIच्या सूचना) ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये (10 ते 14 ऑगस्ट दरम्यान) सोन्याच्या किंमती घसरण्यास सुरुवात झाली. एसकोर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांच्या मते, रशियातून कोरोना व्हॅक्सिनबाबत सकारात्मक बातम्या समोर आल्यानंतर सोन्याच्या किंमतीवर त्याचा परिणाम झाला. 10 ऑगस्ट रोजी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव 55,515 रुपये प्रति  तोळा होते. जे 17 ऑगस्टपर्यंत 2641 रुपयांनी घसरून 52874 रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचले आहेत. चांदी देखील 5840 रुपयांनी कमी होत 67768 रुपये प्रति किलोग्राम  झाली आहे. गेल्या आठवड्याच सोन्याचे दर जवळपास 2000 रुपयांनी उतरले आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold

    पुढील बातम्या