Home /News /money /

RBI ची गारंटीड नफ्याची योजना! 1000 रुपयांपासून करा श्रीगणेशा, दर सहा महिन्यांनी मिळतील पैसे

RBI ची गारंटीड नफ्याची योजना! 1000 रुपयांपासून करा श्रीगणेशा, दर सहा महिन्यांनी मिळतील पैसे

कोरोनाच्या संकटकाळात आरबीआयची फ्लोटिंग रेट सेव्हिंग्‍स बॉन्‍ड्स (Floating Rate Savings Bonds) एक सुरक्षित पर्याय आहे. ज्यातून एक नियमित उत्पन्न मिळू शकते.

    नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) संपूर्ण जगभरात अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. कोरोनाची नवीन प्रकरणे रोज समोर येत आहेत, त्यामुळे अर्थव्यवस्था आणखी बिघडत चालली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने व्याजदरामध्ये कपात केली आहे. फिक्‍स्‍ड डिपॉजिट्स (FD) सारख्या पारंपरिक गुंतवणुकीच्या पर्यायांमधील फायदा देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी देखील (Senior Citizens) गुंतवणुकीचे पर्याय मर्यादित झाले आहेत. गुंतवणूक कोण करू शकेल? कोरोनाच्या संकटकाळात आरबीआयची फ्लोटिंग रेट सेव्हिंग्‍स बॉन्‍ड्स (Floating Rate Savings Bonds) एक सुरक्षित पर्याय आहे. ज्यातून एक नियमित उत्पन्न मिळू शकते. आरबीआयने 7.75 टक्के फिक्‍स्‍ड इंटरेस्‍ट रेट असणारे बाँड्स बंद केल्यानंतर फ्लोटिंग रेट सेव्हिंग्‍स बॉन्‍ड्स सुरू केले. यामध्ये गुंतवणुकीवर 7.15 टक्के गारंटीड रिटर्न मिळेल. यामध्ये कोणतीही व्यक्ती (Individual) आणि हिंदू अविभाजीत परिवावर (HUF) गुंतवणूक करू शकतात. फ्लोटिंग रेट सेव्हिंग्‍स बॉन्‍ड्समध्ये भारतीय वंशाचे परदेशात राहणारे लोक किंवा एनआरआय गुंतवणूक करू शकत नाहीत. 7  वर्षांचा आहे लॉक-इन पीरिएड, मुलांच्या नावाने करू शकता गुंतवणूक कोणताही भारतीय नागरिक पालक म्हणून अल्पवयीन मुलांच्या नावावर बाँड्समध्ये गुंतवणूक करु शकतो. आपण बाँडसाठी संयुक्तपणे अर्ज देखील करू शकता. आरबीआयच्या या बाँडमध्ये भारतीय नागरिक किमान एक हजार रुपयांनी गुंतवणूक करण्यास सुरवात करू शकतात. कोणतीही जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा नाही. या बाँडमधील गुंतवणूकीचा लॉक-इन कालावधी 7 वर्षे आहे, म्हणजे आपण या कालावधीत पैसे काढू शकत नाही. सहामाही आधारावर मिळेल व्याज आरबीआयच्या या बाँडवर सहामाही व्याज दिले जाते. त्याचे पहिले पेमेंट 1 जानेवारी 2021 रोजी होईल. दर सहा महिन्यांनी व्याज दर निश्चित केले जातात. व्याज दरामध्ये प्रथम बदल 1 जानेवारी 2021 रोजी केला जाईल. तुम्हाला आता करण्यात आलेल्या गुंतवणूकीवर 7.15 टक्के दराने व्याज 1 जानेवारी 2021 रोजी मिळेल. आरबीआयच्या 7.75% फिक्‍स्‍ड इंटरेस्‍ट रेट बॉन्‍ड्ससारखे फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड्सच्या मॅच्यूरिटीवेळी एकत्रित व्याज (Cumulative Interest) मिळविण्याचा कोणताही पर्याय नाही आहे. (हे वाचा-तुमच्या बँक खात्यावर आहे हॅकर्सची नजर, फसवणूक टाळण्यासाठी वाचा SBIच्या सूचना) फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड्समध्ये इनकम टॅक्समध्ये सूट मिळण्याचा फायदा नाही आहे. या बाँड्समधून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे करपात्र असेल. या बाँड्सच्या व्याजातून मिळणार्‍या रकमेवर संपूर्ण कर भरावा लागेल. व्याज उत्पन्नावर टीडीएस वजा केला जाईल. आपण या बाँडसाठी कोणत्याही सरकारी बँक किंवा आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अ‍ॅक्सिस बँक यासारख्या मोठ्या खाजगी बँकांद्वारे अर्ज करू शकता. आपण या बाँड्ससाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकता. या रोख्यांमध्ये 20,000 रुपयांपर्यंत रोखीची गुंतवणूक केली जाऊ शकते. आरबीआयच्या बाँड्ससाठी अर्ज करताना तुम्हाला तुमची बँक डिटेल्स द्यावे लागेल, जेणेकरून व्याज थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. या बाँड्समध्ये 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे नागरिक मॅच्युरिटी आधी पैसे काढण्यासाठी पात्र नाही आहेत. संपादन- जान्हवी भाटकर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Rbi

    पुढील बातम्या