मराठी बातम्या /बातम्या /मनी /

खूशखबर! या तारखेला बँक ऑफ बडोदा विकतेय स्वस्त प्रॉपर्टी, खरेदी करा तुमचं स्वत:चं घर

खूशखबर! या तारखेला बँक ऑफ बडोदा विकतेय स्वस्त प्रॉपर्टी, खरेदी करा तुमचं स्वत:चं घर

Bank of Baroda E-Auction: घर घेण्याचं स्वप्न आजही अनेक जण उराशी बाळगून आहेत. तुम्ही देखील घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्हाला बाजार भावापेक्षा कमी किंमतीत घर खरेदी करता येईल.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: घर घेण्याचं स्वप्न आजही अनेक जण उराशी बाळगून आहेत. तुम्ही देखील घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्हाला बाजार भावापेक्षा कमी किंमतीत घर खरेदी करता येईल. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात घरखरेदीची (Residential Property) संधी मिळेल. BoB कडून काही मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. हा ई-लिलाव 8 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

बँक ऑफ बडोदाकडून अशा प्रॉपर्टींचा लिलाव केला जाणार आहे, ज्या डिफॉल्टच्या यादीमध्ये आल्या आहेत. याबाबत IBAPI (Indian Banks Auctions Mortgaged Properties Information) कडून माहिती देण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदाकडून रेसिडेंशियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, अ‍ॅग्रीकल्चर प्रॉपर्टी स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

हे वाचा-सोन्याचांदीच्या किंमतीत जबरदस्त उसळी, सणासुदीच्या काळात खरेदीआधी तपासा आजचा भाव

केव्हा होणार आहे लिलाव?

बँक ऑफ बडोदाकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, तुमच्या पसंतीची प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तयार व्हा! 8 ऑक्टोबर 2021 रोजी बँक ऑफ बडोदा ई-लिलाव (Mega E-Auction) करणार आहे. याठिकाणी तुमच्या पसंतीची प्रॉपर्टी तुम्हाला सहज मिळून जाईल. याबाबत अधिक माहिती-bit.ly/3y6R68U

कुठे कराल रजिस्ट्रेशन?

बँक ऑफ बडोदाच्या मेगा ई-ऑक्शनमध्ये इच्छूक बिडरला e Bkray पोर्टल https://ibapi.in/ वर रजिस्ट्रेशन करावं लागेल. बिडर्स रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर बिडरला आपल्या मोबाईल नंबर आणि Email ID चा वापर करुन E-Auction प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावं लागेल.

KYC डॉक्यूमेंट्सची आवश्यकता

बिडरला KYC डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. KYC डॉक्युमेंट E-Auction सर्विस प्रोवाइडर द्वारा व्हेरिफिकेशन केलं जाईल. यासाठी कमीत-कमी दोन वर्किंग डे इतका वेळ लागू शकतो.

हे वाचा-ICICI Bank ची फेस्टिव्ह ऑफर! शॉपिंगपासून लोनपर्यंत मिळवा भरभक्कम सूट

माहितीकरता या लिंकवर करा क्लिक

तुम्ही अधिक माहितीकरता https://ibapi.in/https://www.bankofbaroda.in/e auction.htm?utm_source=SM&utm_medium=Post&utm_campaign=MegaAuction_km या लिंकवर भेट देऊ शकता

बँकेकडून आयोजित केला जातो लिलाव

ज्या प्रापर्टीच्या मालकांनी त्या जागेचं कर्ज फेडलं नसेल किंवा एखाद्या कारणाने ते कर्ज देऊ शकत नसतील, त्या सर्वांची प्रापर्टी बँकेद्वारा जप्त केली जाते. बँकांकडून वेळोवेळी अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. अशाप्रकारच्या लिलावात बँक अशा प्रापर्टी विकून आपली रक्कम वसूल करुन घेतात.

First published:

Tags: Bank details, Property, बँक