मराठी बातम्या /बातम्या /मनी /

विक्रमी वाढीनंतर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, असे आहेत आजचे दर

विक्रमी वाढीनंतर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, असे आहेत आजचे दर

सोमवारी विक्रमी वाढ झाल्यानंतर आज सोन्याच्या किंमतीत घसरल्या आहेत. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोन्याच्या किमती येत्या काळात वाढू शकतात.

सोमवारी विक्रमी वाढ झाल्यानंतर आज सोन्याच्या किंमतीत घसरल्या आहेत. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोन्याच्या किमती येत्या काळात वाढू शकतात.

सोमवारी विक्रमी वाढ झाल्यानंतर आज सोन्याच्या किंमतीत घसरल्या आहेत. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोन्याच्या किमती येत्या काळात वाढू शकतात.

    नवी दिल्ली, 19 मे : अमेरिका आणि चीनमधील वाढता तणाव (US-China Tension) आणि कोरोनाच्या संकटामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात सेफ इनव्हेस्टमेंट (Gold Safe Investment Buying) खरेदी करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळं सोन्याच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, सोमवारी विक्रमी वाढ झाल्यानंतर आज सोन्याच्या किंमतीत घसरल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, MCXवरील सोन्याची किंमत दहा ग्रॅम प्रति 1000 रुपयांनी घसरून 46 हजार रुपयांवर आली आहे. मंगळवारी MCX वरील सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम 47 हजार 980 रुपयांवरून 46 हजार 853 रुपये प्रति दहा ग्रॅमवर घसरले. तज्ज्ञांच्या मते कोरोना व्हायरच्या (Coronavirus) वाढत्या संक्रमणाचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. त्याचप्रमाणे अमेरिका आणि चीनमध्ये वाढत्या तणावामुळे शेअर बाजारात घसरण झाली आहे. त्याचा देखील मोठा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. वाचा-कर्ज परतफेड करण्यासाठी RBI कडून आणखी तीन महिन्यांची सूट मिळण्याची शक्यता - अहवाल सोन्याच्या किमतीत किती होणार वाढ? तज्ञांचे म्हणणे आहे की जागतिक अर्थव्यवस्था सध्या मंदीच्या जाळ्यात अडकली आहे. त्यातच अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव पुन्हा वाढत आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा सोन्याची खरेदी सुरू केली आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोन्याच्या किमती येत्या काळात वाढू शकतात. सोनं लवकरच 50 हजारांवर जाऊ शकते. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार देशात सुमारे 22-25 हजार टन सोनं घरात पडून आहे, जे सध्या वापरात नाही. ग्रामीण भागात यातील 65 टक्के भाग आहे. वाचा-15 जूनपासून शॉपिंग मॉल सुरू होण्याची शक्यता,सिनेमागृहांसाठी असू शकतात हे नियम कधी खुलणार दुकानं? ज्वेलर्सचे म्हणणे आहे की -4 मध्ये लॉकडाउन शिथिल केले गेले आहे. येत्या काही दिवसांत याच मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ज्वेलर्स आपले दुकान उघडतील. वाचा-चीनमधून बाहेर पडली ही जर्मन कंपनी, भारतात सुरू करणार व्यवहार
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या