मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सोमवारच्या घसरणीनंतर आज पुन्हा वधारले सोन्या-चांदीचे दर, इथे वाचा मंगळवारच्या किंमती

सोमवारच्या घसरणीनंतर आज पुन्हा वधारले सोन्या-चांदीचे दर, इथे वाचा मंगळवारच्या किंमती

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत.

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत.

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत.

    नवी दिल्ली, 16 जून : सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. मंगळवारी सकाळी देशभरातील सराफा बाजारामध्ये सोन्याच्या स्पॉट किंमतीमध्ये वाढ झाली आहे. सोन्याच्या किंमती 267 रुपयांनी वाढल्याने 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति तोळा 47314 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 23 कॅरेट आणि 18 कॅरेट या शुद्धतेच्या सोन्यामध्ये आज वाढ झाल्याचे दिसले. चांदी देखील आज वधारली आहे. चांदीच्या किंमतीमध्ये आज प्रति किलो 630 रुपयांची वाढ झाली आहे. 23 कॅरेट सोन्याचे दर आज 266 रुपयांनी वाढून 47125 रुपये प्रति तोळा इतके आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या किमती 43340 रुपये प्रति तोळा इतक्या आहेत. यामध्ये 245 रुपयांची वाढ झाली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या किंमती 201 रुपयांची वाढ झाली असून त्याची किंमत प्रति तोळा 35486 रुपये आहे. 24 कॅरेट सोने सोमवारी 47047 रुपयांवर पोहोचले होते, त्यामध्ये आज 267 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचांदीच्या या किंमतीवर जीएसटी नाही लावण्यात आलेला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाइट (ibjarates.com)वर सोन्याचांदीच्या किंमती अपडेट केल्या जातात. त्यानुसार आजचे दर वधारलेले पाहायला मिळाले आहेत. वाचा-चीनबरोबर तणाव वाढल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण, बुडाले 34 हजार कोटी सोन्याच्या वायदे किंमतीतही वाढ सोन्याच्या स्पॉट किंमतीत वाढ झाल्यानंतर मंगळवारी सोन्याच्या वायदे बाजारातही किंमती वाढली आहेत. यामध्ये 310 रुपयांनी सोने महागले आहे, परिणामी वायदे बाजारात सोन्याच्या किंमती 47,336 रुपये प्रति तोळा आहेत. एमसीएक्स एक्सचेंजवर ऑगस्ट महिन्यासाठी सोन्याच्या किंमती 310 रुपयांनी वाढून 47,336 रुपयांवर पोहोचल्या आहे. ऑक्टोबर महिन्यासाठी हे दर 303 रुपयांनी वाढून 47,443 रुपयांवर पोहोचले आहेत. वाचा-नोकरदार वर्गासाठी खूशखबर! EPFOच्या या निर्णयामुळे पीएफचे पैसे काढणं झालं सोपं वाचा-देशातील सर्वात मोठ्या कंपनीने सुरू केली कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात संपादन-जान्हवी भाटकर.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या