नोकरदार वर्गासाठी खूशखबर! EPFOच्या या निर्णयामुळे पीएफचे पैसे काढणं झालं सोपं

नोकरदार वर्गासाठी खूशखबर! EPFOच्या या निर्णयामुळे पीएफचे पैसे काढणं झालं सोपं

ईपीएफओ अर्थात भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO-Employees Provident Fund Organisation) त्यांच्या खातेधारकांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 जून : ईपीएफओ अर्थात भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO-Employees Provident Fund Organisation) त्यांच्या खातेधारकांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. कामगार मंत्रालयाने (Ministry of Labour) ने जारी केलेल्या निवेदनानुसार आता ईपीएफओ देशातील कोणत्याही प्रादेशिक कार्यालयात केलेले दावे (Claims) निकाली काढण्यास सक्षम असेल. याअंतर्गत भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, आंशिक पैसे काढणे याप्रकारचे ऑनलाईन दावे सुलभरित्या पूर्ण करता येतील.

समजा जर तुमचे कार्यालय मुंबईमध्ये असेल आणि तुमचे खातेही मुंबईतील पीएफ कार्यालयात असेल तर आधी तुमची पीएफ क्लेम सेटलमेंट मुंबईमध्ये व्हायची.  परंतू आता  ही प्रक्रिया कोणत्याही कार्यालयातून पार पाडता येईल. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण, बरीच पीएफ कार्यालये अद्याप बंद आहेत.

(हे वाचा-देशातील सर्वात मोठ्या कंपनीने सुरू केली कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात)

मंत्रालयाने अशी माहिती दिली आहे की, कोरोना व्हायरसच्या साथीमुळे मुंबई, ठाणे, हरियाणा आणि चेन्नई विभागातील अनेक कार्यालये मर्यादित कर्मचार्‍यांवर कार्यरत आहेत, त्याचवेळी दाव्यांची संख्या मात्र वाढली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, यामुळे या कार्यालयांमध्ये प्रलंबित दाव्यांची संख्या बरीच वाढली आहे आणि त्यावर तोडगा निघण्यास उशीर होत आहे. अशा स्थितीत सर्व कार्यालयांमध्ये दावे पूर्ण करण्यासंबधित काम समान स्वरूपात सुरू करून विलंब टाळता येईल.

निवृत्तीवेतनधारकांसाठी हे नियम केले सुलभ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) त्यांच्या निवृत्तीवेतनाचा जीवन दाखला सादर करण्यासाठी सामायिक सेवा केंद्रांचा (सीएससी) वापर करणार आहे. पेन्शन सुरू ठेवण्यासाठी ईपीएस पेन्शनर्सना दरवर्षी लाइफ प्रूफ द्यावा लागतो. सीएससी व्यतिरिक्त ईपीएस पेन्शनधारक 135 क्षेत्रीय कार्यालये, 117 जिल्हा कार्यालये आणि पेन्शन वितरित बँकांद्वारे लाइफ प्रूफ सादर करू शकतात.

(हे वाचा-2 लाखामध्ये सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला होईल 1 लाखाची कमाई)

ईपीएस पेन्शनधारक त्यांच्या सोयीनुसार एजन्सीची निवड करू शकतात.  सामायिक सेवा केंद्रांबाबतची ही माहिती एका अधिकृत निवेदनात देण्यात आली आहे.

First published: June 16, 2020, 1:29 PM IST

ताज्या बातम्या