मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Corona Effect : इतिहासात पहिल्यांदा देशातील सर्वात मोठ्या कंपनीने सुरू केली कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात

Corona Effect : इतिहासात पहिल्यांदा देशातील सर्वात मोठ्या कंपनीने सुरू केली कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात

या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, व्हॉइस प्रेसिडेंट लेव्हल आणि त्यापेक्षा वरिष्ठ पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 15 ते 20 टक्क्यांची कपात सुरू करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 16 जून : टाटा सन्स (Tata Sons)ने त्यांचा खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यास सुरुवात केली आहे. CNBC-TV18 ने दिलेल्या माहितीनूसार कोरोना व्हायरस (Coronavirus)च्या वाढत्या संकटामुळे टाटा सन्सचा व्यवसाय प्रभावित झाला आहे. अहवालात अशी माहिती देण्यात आली आहे यामुळे टाटा सन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना झटका बसला आहे. या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, व्हॉइस प्रेसिडेंट लेव्हल आणि त्यापेक्षा वरिष्ठ पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 15 ते 20 टक्क्यांची कपात सुरू करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमुळे झालेले नुकसान टाळण्यासाठी कंपनीने आवश्यक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. टाटा समूहाने इतिहासात पहिल्यांदा टाटा सन्सचे चेअरमन तसंच सहाय्यक कंपन्यांच्या सीईओंच्या पगारात जवळपास 20 टक्के कपात केली आहे. वाचा-2 लाखामध्ये सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला होईल 1 लाखाची कमाई CNBC-TV18 ने टाटा सन्सशी संपर्क केल्यानंतर त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. इंडिविज्यूअल ग्रृपच्या कंपन्यांनी आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे. CNBC-TV18च्या मते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये 15 ते 20 टक्के पगार कपात होण्याची शक्यता आहे. टाटा केमिकल्स, टाटा कंस्यूमर आणि इंडियन हॉटेल्स मध्ये देखील 20 टक्क्यांची कपात होण्याची शक्यता आहे. अहवालामध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, टाटा स्टील आणि टाटा मोटर्सच्या वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांच्या पगारात 25 टक्क्यांची कपात होऊ शकते. ही पगार कपात 2020-21 साठीच्या पगारावर लागू होईल. वाचा-'या' कर्मचाऱ्यांची पुढील वर्षापर्यंत पगारवाढ नाही, सरकारने जारी केले आदेश पगारकपातीची बातमी लग्झरी कार निर्माता जॅग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover)चे मालक टाटा मोटर्स द्वारे मार्च 2020च्या तिमाही निकाल जारी झाल्यानंतर आली. मार्च 2020 रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये टाटो मोटर्सला 9894.25 कोटींचे नुकसान झाले होते. मार्च 2019 च्या तिमाहीमध्ये कंपनीला 1117.5 कोटींचे तर आर्थिक वर्ष 2020 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 1738.3 कोटींचा फायदा झाला होता.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Ratan tata, Tata group

    पुढील बातम्या