मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सोन्याचे दर कमी होण्याचा अंदाज! जाणून घ्या किती स्वस्त होणार सोनं?

सोन्याचे दर कमी होण्याचा अंदाज! जाणून घ्या किती स्वस्त होणार सोनं?

आगामी काळात सोन्यात गुंतवणूक करण्याचं नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

आगामी काळात सोन्यात गुंतवणूक करण्याचं नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

आगामी काळात सोन्यात गुंतवणूक करण्याचं नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट: सोनं (Gold rate) हा गुंतवणुकीसाठी (Investment in Gold) एक चांगला पर्याय मानला जातो. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन किंवा कडक निर्बंधामुळे सारं काही ठप्प झाल्याने जगभरातल्या विविध देशांच्या अर्थव्यवस्थेला (Economy) फटका बसल्याचं दिसून आले. आता ज्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे, तेथे कोलमडलेली अर्थव्यवस्था सुरळीत होत असल्याचे चित्र आहे. अशा सर्व स्थितीत सोन्यात गुंतवणूक करण्याकडे असलेला कल कायम आहे. मात्र, तुम्ही आगामी काळात सोन्यात गुंतवणूक करण्याचं नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण यूबीएस या बहुराष्ट्रीय गुंतवणूक बॅंकेच्या एजी या संशोधक गटाने सोन्याच्या किमतीच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. सोन्याच्या दरात मोठी घट होण्याची शक्यता या संशोधक गटाने वर्तवली आहे. याबाबतचं सविस्तर वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिलं आहे.

एकीकडे कोरोनामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था काही अंशी सुधारत असताना बुलियन होल्डिंगबाबत विचार करावा असा सल्ला यूबीएस ग्रुपने (UBS Group) गुंतवणूकदारांना दिला आहे. यूबीएस ग्लोबल वेल्थ मॅनेजमेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयातले कमोडिटीज आणि आशिया पॅसिफिक फॉरिन एक्स्चेंजचे प्रमुख डोमिनिक श्नाइडर यांनी सोनं आणि चांदीच्या दरात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. सोमवारी ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत डोमिनिक श्नाइडर यांनी सांगितलं, की सोन्याचे दर 1600 डॉलर प्रति औंस, तर चांदीचे दर 22 डॉलर प्रति औंस इतके कमी होऊ शकतात.

सोन्यात गुंतवणुकीसाठी आहेत विविध पर्याय, पाहा तुमच्यासाठी काय ठरेल फायद्याचं

या पार्श्वभूमीवर यूबीएस ग्रुपमधल्या कमोडिटी तज्ज्ञांनी, टॅक्टिकल पोझिशनमध्ये असल्यास गुंतवणूकदारांनी यातून बाहेर पडावं; परंतु रणनीतीपूर्वक किंवा अभ्यास करून यात गुंतवणूक केली असेल तर हेजिंग करावं असा सल्ला दिला आहे. तुम्ही सोन्यात भरपूर गुंतवणूक केली असेल तर थोडं सोनं विकून, प्लॅटिनम (Platinum) किंवा अन्य धातूंमध्ये ही गुंतवणूक वळवावी. महागड्या धातूंमध्ये गुंतवणूक जोखमीची असल्याने यास प्लॅटिनम हा चांगला पर्याय ठरू शकतो, असं डोमिनिक श्नाइडर यांनी सांगितलं आहे.

सोनं, कार किंवा कर्ज हवं आहे का? देशातील सर्वात मोठी बँक देतेय बेस्ट ऑफर

यूबीएस ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा होत आहे. अमेरिकी जॉब मार्केटचा डेटा अपेक्षेपेक्षा अधिक चांगला आहे. मंगळवारचा रिटेल सेल डेटा (Retail Sale Data) ही चांगला असेल अशी अपेक्षा आहे. अशा स्थितीत फेडरल रिझर्व्ह वेळेपूर्वी व्याजवाढीचा निर्णय घेऊ शकतं. अर्थव्यवस्था सुधारत असताना सोन्याच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारत असेल तर खात्रीशीर भविष्याची चिंता कोणीही करत बसणार नाही. अशा स्थितीत बाजार संतुलित राहावा, यावरच भर दिला जाईल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

1947मध्ये 88 रुपये होतं सोनं, आजपर्यंत सोन्याने दिला 52000% चा रिटर्न

एका अहवालानुसार, याविषयी अन्य काही तज्ज्ञांचं मत मात्र थोडे वेगळे आहे. हे तज्ज्ञ सोने दराबाबत खूप आशावादी असून, त्यांचा अंदाज यूबीएस ग्रुपच्या अगदी उलट आहे. ग्राहक आणि सरकारी बॅंकांकडून खरेदी वाढल्याने वर्षाच्या अखेरीस सोन्याचे दर 2000 डॉलरपर्यंत पोहोचतील, असा अंदाज गोल्डमन सॅक्सने व्यक्त केला आहे. अॅक्सेस लिक्विडिटीचे परिणाम भयंकर असतील, असं मत क्वाड्रिगा इग्निओ फंडाचे फंड मॅनेजर दिएगो पॅरिला यांनी व्यक्त केले आहे. व्याजदर कमी असल्याने मालमत्ता फुगवटा (Assets Bubble) तयार झाला आहे. हा फुगवटा जेव्हा फुटेल तेव्हा जगभरातील सरकारी बॅंकांना तो सांभाळणं मुश्कील ठरेल. येत्या 3 ते 5 वर्षांत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 3000 ते 5000 डॉलर प्रति औंस या स्तरावर असतील, असा अंदाज दिएगो पॅरिला यांनी व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Economy, Gold, Gold price