मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Investment: सोन्यात गुंतवणुकीसाठी आहेत विविध पर्याय, पाहा तुमच्यासाठी काय ठरेल फायद्याचं

Gold Investment: सोन्यात गुंतवणुकीसाठी आहेत विविध पर्याय, पाहा तुमच्यासाठी काय ठरेल फायद्याचं

दीड-दोन वर्षांसाठी सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. जाणून घ्या सोन्यात गुंतवणूक करण्यासाठीचे वेगवेगळे पर्याय...

दीड-दोन वर्षांसाठी सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. जाणून घ्या सोन्यात गुंतवणूक करण्यासाठीचे वेगवेगळे पर्याय...

दीड-दोन वर्षांसाठी सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. जाणून घ्या सोन्यात गुंतवणूक करण्यासाठीचे वेगवेगळे पर्याय...

    नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : भारतीय लोक गुंतवणुकीसाठी सोन्याला (Gold) नेहमीच प्राधान्य देतात. अडी-अडचणीच्या काळी सोन्याचा उपयोग केला जातो. ही सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी गुंतवणूक मानली जाते. बदलत्या काळात सोन्यात अधिक व्यावसायिक पद्धतीने गुंतवणूक केली जाते. तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सध्या अतिशय योग्य वेळ आहे. कारण सध्या सोन्याचे भाव चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर असून, दीर्घ काळासाठी सोन्यात चांगली वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एमसीएक्सवर (MCX) सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी जवळपास 46 हजार 980 रुपये होता.

    केडिया अॅडव्हायझरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय केडिया यांच्या मते, गुंतवणूकदार एक ते दोन महिन्यांसाठी गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याचा विचार करत असतील तर त्यांनी सोन्यापासून दूर राहावं. दीड-दोन वर्षांसाठी सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. अडीच वर्षांत सोन्याच्या किंमती 40 ते 55 हजारांच्या दरम्यान जातील. त्यामुळे सध्या 45 ते 46 हजार रुपयांच्या पातळीवर सोनं खरेदी करणं योग्य ठरेल. सहा महिन्यांत सोनं प्रति 10 ग्रॅम 50 हजार रुपये आणि एका वर्षात 54 हजार रुपयांवर पोहोचलेलं दिसेल. त्यामुळे सध्या सोनं खरेदी करण्यासाठी योग्य वेळ आहे.

    सोनं, कार किंवा कर्ज हवं आहे का? देशातील सर्वात मोठी बँक देतेय बेस्ट ऑफर

    सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.

    फिजिकल गोल्ड (Physical Gold) :

    फिजिकल गोल्ड अर्थात भौतिक स्वरूपात म्हणजेच प्रत्यक्ष स्वरुपात सोनं खरेदी करता येतं. ग्राहक कोणत्याही ज्वेलर्सच्या दुकानात सोनं खरेदी करू शकतात. अशी खरेदी करताना ग्राहकाने सरकारने घालून दिलेल्या मानकांनुसार सोन्याची शुद्धता तपासण्याची काळजी घ्यावी. अशा सोनं खरेदीतील एक तोटा म्हणजे ते चोरीला जाण्याची भीती. हे सोने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं, तर तुम्हाला त्यासाठी शुल्क भरावं लागतं. तरीही देशातील बहुतांश लोक केवळ अशा स्वरूपातील सोनं खरेदी करणंच पसंत करतात.

    सॉव्हेरियन गोल्ड बाँड (SGB) :

    सॉव्हेरियन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bonds) सरकारकडून जारी केले जातात. म्हणूनच त्यांना सार्वभौम हमी आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात गुंतवणुकीच्या रकमेवर दरवर्षी 2.50 टक्के निश्चित व्याज दराने व्याज (Interest) मिळतं. सहामाही आधारावर गुंतवणुकदाराच्या बँक खात्यात हे व्याज जमा केलं जातं. गुंतवणुकदारांना मुदत संपल्यानंतर बाजारभावाचा फायदा घेता येतो. तसंच यावर व्याजाचाही लाभ मिळतो. या बाँड्सची किंमत 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीशी जोडलेली आहे. एक्सचेंजवर याची खरेदी-विक्री करता येते.

    1947मध्ये 88 रुपये होतं सोनं, आजपर्यंत सोन्याने दिला 52000% चा रिटर्न

    गोल्ड ईटीएफ (Gold ETF) :

    ज्यांना भौतिक स्वरूपातील सोन्यात गुंतवणूक करायची नाही, त्यांच्यासाठी गोल्ड ईटीएफ हा सर्वोत्तम पर्याय आहे. एक गोल्ड ईटीएफ युनिट म्हणजे 1 ग्रॅम सोनं. हे 100 टक्के शुद्ध सोनं आहे. मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) इथे एखाद्या शेअरप्रमाणेच गोल्ड ईटीएफची खरेदी आणि विक्री करता येते. यामध्ये ग्राहक एसआयपीद्वारे देखील गुंतवणूक करू शकतात.

    डिजिटल सोनं (Digital Gold) :

    ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे (Online Platform) सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा एक मार्ग आहे. हे भौतिक सोनं म्हणून विकलं जाऊ शकतं किंवा विक्रेत्यास पुन्हा विकता येतं.

    गोल्ड म्युच्युअल फंड (Gold Mutual Fund) :

    सोन्यात गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंडदेखील (Mutual Funds) आहेत. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे. याद्वारे गुंतवणूकदारांना चांगला परतावादेखील मिळतो.

    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, The gold