मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: दिवाळीच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 3000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

Gold Price Today: दिवाळीच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 3000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

दिवाळीआधी सोन्याच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Rate on MCX) सोन्याचे दर उतरले आहेत. आज प्रति तोळा सोन्यामध्ये (Gold Price on 3rd November 2021) 0.93 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 03 नोव्हेंबर: दिवाळीआधी सोन्याच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Rate on MCX) सोन्याचे दर उतरले आहेत. आज प्रति तोळा सोन्यामध्ये (Gold Price on 3rd November 2021) 0.93 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. आज बुधवारी सोन्याचे दर 448 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. यामुळे दिवाळीच्या एक दिवस आधी सोन्याचे दर 47,513 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. आज चांदीचे दर देखील (Silver price Today) उतरले आहेत. आज चांदीचे दर 0.04 टक्क्यांनी उतरले आहेत. या घसरणीनंतर 63,200 रुपये प्रति किलोवर आहेत.

3000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

गेल्या वर्षी दिवाळीत सोन्याचा भाव 50,625 रुपये प्रति ग्रॅम होता, आज सोन्याचा भाव 47,513आहे. अशा परिस्थितीत आज सोन्याचे दर गेल्यावर्षीच्या दरापेक्षा 3000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. उद्या गुरुवारी (04 नोव्हेंबर) दिवाळी आहे. या काळात सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी शुभ मानली जाते. या काळात बहुतेक भारतीय सोन्याची खरेदी करतात. अशा परिस्थितीत तुम्हालाही सोने खरेदी करायचे असेल, तर आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अर्थात सध्या सोन्याची खरेदी करणं तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

हे वाचा-दहा वर्षात Ola कंपनी सुरु झाल्यापासून पहिल्यांदा नफ्यात, IPO ही आणण्याची तयारी

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, आज कॉमेक्सवर सोन्याच्या किमतीत 0.93 टक्क्यांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळालेल्या तेजीच्या संकेतांमुळे सोन्याच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. त्याच वेळी, यूएस यील्डमध्ये उसळी आणि मजबूत डॉलरची मागणी यामुळे सोन्याच्या किमतीतही घसरण झाली आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर

तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

हे वाचा-तुम्ही खरेदी केलेलं Gold असली आहे की नकली, घरबसल्या असं तपासा

अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today