• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold-Silver Prices Today: दोन दिवसांनी पुन्हा वाढले सोन्याचे दर, चांदीलाही झळाळी

Gold-Silver Prices Today: दोन दिवसांनी पुन्हा वाढले सोन्याचे दर, चांदीलाही झळाळी

Gold and Silver Price on 03rd Feb 2021: मंगळवारी सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये घसरण झाल्यानंतर आज पुन्हा एकदा या मौल्यवान धातूंच्या किंमती वाढल्या आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज देशांतर्गत सराफा बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमती वधारल्या आहेत. एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे दरात 0.2 टक्क्याने वाढ होत ट्रेडिंगला सुरुवात झाली. ज्यानंतर सोन्याचे लेटेस्ट दर 47,947 रुपये प्रति तोळा (Gold Latest Price) झाले आहेत. तर चांदीच्या किंमतीमध्ये 1.5 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. यानंतर चांदीचे दर 1000 रुपये प्रति किलोने वाढून 68,577 रुपये प्रति किलो झाले आहेत. ग्लोबल मार्केटमधील बदलांमुळे गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या चांदीच्या दरात साधारण 6000 रुपयांची घसरण झाली होती. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर दिल्लीतील सराफा बाजारात 47,702 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे सोन्याचे भाव 0.4% ने वाढून 1,844.48 डॉलर प्रति औंस झाले आहेत. याआधीच्या सत्रात 8% घसरण झाली होती. चांदीचे वायदे किंमत 27.25 डॉलर प्रति औंस झाली आहे. चांदीच्या या किंमतीत 3.2% वाढ झाली आहे. (हे वाचा-PNB देत आहे स्वस्त सोनेखरेदीची सुवर्णसंधी! वाचा कशाप्रकारे मिळेल फायदा) दोन दिवसात मोठी घसरण सोन्याच्या दरात मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात 480 रुपये प्रति तोळाची घसरण झाली होती. चांदीचे दरही मोठ्या फरकाने कमी झाले होते. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर 48,182 रुपये प्रति तोळा झाले होते, तर चांदी 73,219 रुपये प्रति किलो होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही दर बरेच कमी झाले होते. (हे वाचा-मोठी बातमी! Jeff Bezos यांचा Amazonच्या सीईओ पदावरून राजीनामा) 5 टक्क्याने कमी झालं आयात शुल्क अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात असे जाहीर केले की, सोन्याचांदीवरील आयात शुल्क (import tax) घटवण्यात येत आहे. सोन्याचांदीवरील आयात शुल्क 5 टक्क्याने घटवले आहे. सध्या सोन्याचांदीवर 12.5 टक्के आयात शुल्क द्यावे लागत आहे, या कपातीच्या निर्णयानंतर केवळ 7.5 टक्के आयात शुल्क द्यावे लागेल. यामुळे आणखी काही प्रमाणात सोन्याचांदीचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: