वॉशिंग्टन, 03 फेब्रुवारी: Amazon चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. या वर्षाअखेरपर्यंत ते त्यांचे पद सोडतील. अॅमेझॉनने मंगळवारी अशी घोषणा केली आहे की, एडब्ल्यूएसचे सीईओ अँडी जेसी (Andy Jassy) या वर्षातील तिसऱ्या तिमाहीमध्ये जेफ बेझोस यांचे स्थान घेतील. यासह जेफ बेझोस यांनी अशी माहिती दिली आहे की, ते बोर्डचे कार्यकारी अध्यक्ष असतील. बेझोस यांनी आपल्या कर्मचार्यांना त्यांना या निर्णयाबद्दल माहिती देणारे पत्र देखील पाठवले आहे. मंगळवारी त्यांनी लिहलेल्या या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की, ते कंपनीच्या CEO पदाची भूमिका सोडत आहेत. Jassy सध्या अॅमेझॉनच्या वेब सर्व्हिसचे प्रमुख आहेत. कोरोना काळात नफ्यामध्ये रेकॉर्ड स्तरावर झाला नफा बेझोस यांनी स्टार्टअपच्या स्वरुपात अॅमेझॉनची स्थापना केली होती. आता अॅमेझॉन ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी बनली आहे. अॅमेझॉनमधील भागीदारीमुळे जेफ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या या कंपनीने 2020 च्या शेवटच्या तीन महिन्यात 100 बिलियन डॉलरची विक्री केली होती. ज्यामुळे अॅमेझॉनला होणारा नफा रेकॉर्ड स्तराने वाढला होता. (हे वाचा- Aadhar Card मध्ये बदल करायचेत; आधार केंद्रात जाण्याऐवजी आता घरबसल्याच करा काम ) राजीनाम्यानंतर यावर लक्ष केंद्रीत करणार बेझोस बेझोस यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की, ते अॅमेझॉनच्या महत्त्वाच्या प्रोजेक्ट्समध्ये सामील असतील पण फिलेन्थ्रॉपिक इनीशिएटिव्ह्स अर्थात कल्याणकारी योजना डे वन फंड आणि बेझोस अर्थ फंड यावर ते लक्ष केंद्रीत करणार आहेत. त्यांनी अँडी जेसी यांच्याबद्दल देखील विश्वास व्यक्त केला आहे. बेझोस अॅमेझॉन व्यतिरिक्त वॉशिंग्टन पोस्ट हे वृत्तपत्र आणि खाजगी स्पेस कंपनी ब्लू ओरिजिनचे मालक आहेत. (हे वाचा- कमी भांडवल अधिक नफा; फक्त 50 हजार खर्चून वर्षाला कमवा अडीच लाख रुपये ) 1994 मध्ये केली होती स्थापना 1994 मध्ये जेफ बेझोस यांनी अॅमेझॉनची स्थापना केली होती. एक ऑनलाइन बुक स्टोअर ते मेगा ऑनलाइन रिटेलर अशी ओळख अॅमेझॉनने बनवली आहे. जगभरात विविध प्रकारची उत्पादनं अॅमेझॉनकडून विकली जातात. भारतातही अॅमेझॉनने त्यांचं बस्तान बसवलं आहे. कोरोना काळात विविध ऑफर्स, घरपोच सेवा इ. सुविधांचा वापर ग्राहकांनी केला. याकाळात अॅमेझॉन लोकांच्या फायद्याचे ठरले आहे. ग्रोसरीपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, घराच्या डेकोरेशनसाठी लागणारं सामान, मोबाइल फोन्स इ. अशा आणि अशा अनेक वस्तू अॅमेझॉनवर एका क्लिकवर आज मिळत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







