नवी दिल्ली, 03 जानेवारी: जर तुम्ही देखील स्वस्त सोनेखरेदी करण्याचा विचार करत असाल तर देशातील दुसरी मोठी सरकारी बँक असणारी पंजाब नॅशनल बँक (PNB Punjab National Bank) तुम्हाला ही संधी देत आहे. पीएनबीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. सरकारची सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम (Sovereign Gold Bond) 1 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. 5 फेब्रुवारी 2021 पर्यंत हे बाँड्स खरेदी करता येणार आहेत. 9 फेब्रुवारी रोजी हे बाँड्स इश्यू केले जातील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावेळी गोल्ड सब्सक्रिप्शनची किंमत 4,912 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. गोल्ड बाँडच्या माध्यमातून सोनेखरेदी करण्याची (Sovereign Gold Bond Scheme 2020-21 Series XI) ही अकरावी संधी आहे.
पंजाब नॅशनल बँकेने काय केले ट्वीट?
5 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही हे बाँड्स खरेदी करू शकता, याबाबचे ट्वीट पंजाब नॅशनल बँकेने केले आहे. याचप्रमाणे हे सोने खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल.
Subscription for #SovereignGoldBond is open till February 5th!
Expert Advice: Apply online to get Rs 50/- off! pic.twitter.com/RWzhibretj — Punjab National Bank (@pnbindia) February 2, 2021
कुठून खरेदी कराल सॉव्हरेन गोल्ड बाँड?
सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या प्रत्येक अर्जासाठी PAN आवश्यक आहे. सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त) स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून तुम्ही अर्ज घेऊ शकता, अर्थात हे बाँड खरेदी करू शकता.
काय आहेत सॉव्हरेन गोल्डचे फायदे?
-या गुंतवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, सोन्याचे भाव वाढल्यानंतर लाभ मिळतोच पण त्याचबरोबर गोल्ड बाँडवर गुंतवणूक करणाऱ्यांना वार्षिक 2.5 दराने व्याज मिळेल.
(हे वाचा-मोठी बातमी! Jeff Bezos यांचा Amazonच्या सीईओ पदावरून राजीनामा)
-यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये 400 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकता. कमीतकमी गुंतवणूक 1 ग्रॅमची आहे.
-गुंतवणूकदार स्कीमच्या माध्यमातून बँकेतून कर्ज देखील घेऊ शकतात.
-यावर तुम्हाला सॉव्हरेन (सरकारी) गॅरंटी देखील मिळेल
- मॅच्यूरिटी पीरिएड 8 वर्षांचा आहे, मात्र 6 आणि 7 वर्षांचा देखील पर्याय उपलब्ध आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.