मुंबई, 24 ऑगस्ट : भारतातील प्रसिद्ध टाटा ग्रुप (Tata group) लवकरच सुपर ॲप (super app) लाँच करणार आहे. त्यामुळे टाटा ग्रुपच्या सर्व सेवा या एका ॲपवर उपलब्ध होतील. देशातील वाढत्या ई-कॉमर्सचा विचार करता कंपनीने हा निर्णय घेतला आहे. टाटा कंपनीच्या ग्राहकांसाठी ही आनंदाची अशी बातमी आहे. टाटा ग्रुपचा हा सुपर ॲप चीनच्या व्हीचॅट या सुपर ॲपप्रमाणेच असेल. डिसेंबर 2020 पर्यंत टाटा आपलं सुपर ॲप लाँच करू शकतं, असं सांगितलं जातं आहे. फायनान्शिअल टाइम्स च्या रिपोर्टनुसार टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितलं, हा एक असा सुपर ॲप असेल ज्यामध्ये सर्व ॲप एकाच ठिकाणी असतील. टाटा देशातील अशी एक कंपनी आहे, जिचा प्रत्येक क्षेत्रात सहभाग आहे. मीठापासून साबणापर्यंत आणि सॉफ्टवेअरपासून विमानापर्यंत सगळं काही तयार करणारी नावाजलेली भारतीय कंपनी. पंचतारांकित हॉटेल्स, ऑटोमोबाईल्स, लक्झरी कार, खाद्यपदार्थ यापासून ते विमानसेवा, रिटेल आणि सॉफ्टवेअर उद्योगापर्यंत टाटाचा पसारा सर्वच क्षेत्रात विस्तारला आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये टाटा ब्रँडने नाम कमावलेलं आहे. हे वाचा - GAME मध्ये काढा कोरोनाविरोधातील सर्व भडास; बसल्या बसल्या करा व्हायरसचा नाश टाटा ग्रुप ऑफ कंपनीजच्या सध्या शॉपिंग ॲप टाटा क्लिक, ग्रोसरी आणि ई-स्टोरसाठी स्टार क्विक आणि ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मच्या स्वरूपात क्रोमा उपलब्ध आहे. टाटाच्या सुपर ॲपपच्या माध्यमातून टाटा ग्रुप कंझ्युमर ड्युरेबल्स, इन्शुरन्स, फाइनान्शिअल सर्व्हिस, हेल्थकेअर आणि बिल पेमेंटसारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. टाटाचा हा सुपर ॲप भारतात टाटाच्या स्पर्धकांना टक्कर देणार असल्याचं सांगितलं जातं आहे. हे वाचा - सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, पाहा आजचे दर लंडनच्या कन्सल्टंन्सी ब्रँड फायनान्सने 2019 साली जगातल्या टॉप 100 ब्रँड्सची यादी केली आहे. या यादीत केवळ एकच भारतीय कंपनी स्थान मिळवू शकली ती म्हणजे टाटा. टाटा हा ब्रँड जगातल्या टॉप ब्रँड्सच्या यादीत 86 व्या क्रमांकावर होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.