Home /News /money /

30 हजारांपर्यंत पगार असणाऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता, मिळणार हे फायदे

30 हजारांपर्यंत पगार असणाऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता, मिळणार हे फायदे

2 हजारांच्या नोटींची छपाई बंद करण्याचा कुठलाही विचार नाही. सरकार RBIच्या शिफारशीनुसार त्याबाबत निर्णय घेते असं त्यांनी सांगितलं.

2 हजारांच्या नोटींची छपाई बंद करण्याचा कुठलाही विचार नाही. सरकार RBIच्या शिफारशीनुसार त्याबाबत निर्णय घेते असं त्यांनी सांगितलं.

30 हजारपर्यंतचा पगार असणाऱ्या नोकरदार वर्गासाठी केंद्राकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : नोकरदार वर्गासाठी केंद्राकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सीएनबीसी आवाज (CNBC)ला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच 21 हजारांपेक्षा जास्त पगार असणाऱ्यांना देखील ESIC चा फायद्या मिळणार असल्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संकटकाळात अधिकाधिक कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळे सरकारकडून ESIC च्या काही नियमात बदल केला जाऊ शकतो. याअंतर्गत मेडिकल आणि आर्थिक मदतीचे नियम बदलणार आहेत. याअंतर्गत देण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये 21 हजारांपेक्षा अधिक पगार असणाऱ्यांना देखील सुविधा मिळेल. सूत्रांच्या माहितीनुसार 30000 रुपयांपर्यंत पगार असणाऱ्यांना देखील ESICचा फायदा मिळेल. कामागार मंत्रालयाकडून या नियमामध्ये करण्यात येणाऱ्या बदलांमध्ये तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे जास्त पगार असणाऱ्या लोकांना देखील या योजनेत जोडले जाण्याचा पर्याय उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे बेरोजगार झाल्यास निश्चित मर्याजेप्रमाणे आर्थिक मदत देखील मिळेल. ESIC बोर्डाला लवकरच हा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. (हे वाचा-आता एका WhatsApp मेसेजवर दारात उभं राहणार ATM, वाचा काय आहे SBIची नवीन सेवा) 21 हजारांपर्यंत पगार असणाऱ्यांसाठी सरकारने नुकतेच केले नियमात बदल ESIC बोर्डाने कोरोना व्हायरस संकटकाळात नोकरी गमावणाऱ्या नोकरदार वर्गाला यावर्षी 24 ते 31 डिसेंबरपर्यंत बेरोजगारी बेनिफिट देत दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत आता तीन महिन्याच्या सरासरी पगाराच्या 50 टक्के रक्कम देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला एम्प्लॉयी स्टेट इन्शूरन्स कॉर्पोरेशन (ESIC) बोर्डाने मंजुरी दिली आहे, ज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार (Santosh Gangwar) करत होते. त्यांनी अशी माहिती दिली की, बेरोजगारी लाभासाठी ESIC अंतर्गत करण्यात आलेले क्लेम्स 15 दिवसात पूर्ण केले जातील. 24 मार्च ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत नोकरी गमावल्यामुळे अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट म्हणून केंद्र सरकारने सुमारे 4 दशलक्ष औद्योगिक कामगारांना त्यांच्या तीन महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50 टक्के देण्याच्या पात्रतेच्या निकषात शिथिलता दिली आहे. याआधी 25 टक्के रक्कम दिली जात होती. (हे वाचा-EPFO Alert! फोन आणि सोशल मीडिया ही चूक करणं पडू शकतं महागात) गंगवार यांनी अशी माहिती दिली की, नोकरी गेल्याच्या तारखेनंतर 30 दिवसानंतर या रकमेसाठी क्लेम करता येईल. पहिल्यांदा हा कालावधी 90 दिवस होता. त्याचप्रमाणे आता याकरता क्लेम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना नियोक्ता किंवा तुमच्या कंपनीकडे जाण्याची गरज नाही. बैठकीच्या अजेंडानुसार, क्लेम थेट ESIC च्या शाखा कार्यालयामध्ये जमा केला जाऊ शकतो आणि शाखा स्तरावरच त्याचे व्हेरिफिकेशन देखील केले जाईल. यानंतर थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात क्लेमची रक्कम पाठवण्यात येईल. (हे वाचा-पोस्टाच्या या योजनेत पती-पत्नीने खाते उघडल्यास मिळेल दुप्पट फायदा, वाचा सविस्तर) गंगवार यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ESIC बोर्डाच्या गुरुवारच्या बैठकीत झालेल्या या निर्णयानुसार जवळपास 40 लाख औद्योगिक कर्मचाऱ्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे. ही योजना 'अटल बीमित व्यक्ति कल्याण योजने'अंतर्गत येईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या