जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Rates: सोनेखरेदीची सुवर्णसंधी! आतापर्यंत 12000 रुपयांनी उतरले आहेत दर, इथे तपासा आजचा भाव

Gold Rates: सोनेखरेदीची सुवर्णसंधी! आतापर्यंत 12000 रुपयांनी उतरले आहेत दर, इथे तपासा आजचा भाव

Gold Rates: सोनेखरेदीची सुवर्णसंधी! आतापर्यंत 12000 रुपयांनी उतरले आहेत दर, इथे तपासा आजचा भाव

Gold Rate Today: मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. आज व्यवहार सुरू झाल्यानंतर सुरुवातीला 22 कॅरेट सोन्याचे भाव 160 रुपयांनी वाढून 43,680 रुपये प्रति तोळा झाले आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 मार्च: सोन्याच्या दरात (Gold Rate Today) मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.  आज व्यवहार सुरू झाल्यानंतर सुरुवातीला 22 कॅरेट सोन्याचे भाव 160 रुपयांनी वाढून 43,680 रुपये प्रति तोळा झाले आहेत. सोमवारी सोन्याचे दर 43,520 रुपये प्रति तोळा होते. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange) सोन्याची वायदे किंमत  44,360 प्रति तोळा होती, तर चांदीचे दर (Silver Rates Today) वाढून 0.5 टक्क्यांनी वाढून 66,202 प्रति किलो झाले आहेत. सोन्याचे दर गेल्या 11 महिन्यातील निचांकी स्तरावर पोहोचले आहेत. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळाच्या रेकॉर्ड (Gold Rates Record High) स्तरावर पोहोचले होते. या स्तरावरुन आतापर्यंत सोन्याच्या दरात 12000 रुपयांची घसरण झाली आहे. (हे वाचा- मुथूट फायनान्स उभं करणाऱ्या उद्योजकाचा अपघातात मृत्यू; पाय घसरल्याचं निमित्त ) सोन्याचा आजचा नवा भाव (Gold Rate on 09th March 2021) दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर वाढून 44,150 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. सोमवारी हे दर 43,860 रुपये प्रति तोळा होते. मुंबईमध्ये सोन्याचे दर 09 मार्च 2021 रोजी 43,680 रुपये प्रति तोळा आहेत. एक्साइज ड्यूटी आणि सेसमुळे देशाच्या विविध भागात सोन्याचे दर वेगवेगळे आहेत. कोलकातामध्ये मंगळवारी सोन्याचे भाव (22 कॅरेट) 44,120 रुपये प्रति तोळा आहेत. याठिकाणी 24 कॅरेट सोन्याचे दर 46,760 रुपये प्रति तोळा आहेत. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे भाव 42,210 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे दर 46,050 रुपये प्रति तोळा आहेत. (हे वाचा- 31 मार्चपूर्वी पूर्ण करा पॅन, जीएसटी, FD संबधित ही 7 कामं;अन्यथा बसेल मोठा फटका ) आंतरराष्ट्रीय बाजारातील दर आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचे झाले तर याठिकाणी आज सोन्याचे दर स्थीर आहेत. सोन्याचे दर 1,687.90 डॉलर प्रति औंसवर आहेत. चांदीचे दर 25.12 डॉलर प्रति औंसपर्यंत वाढला असून प्लॅटिनममध्येही 1 टक्क्याने वाढ झाली आहे. यानंतर प्लॅटिनमचा दर 1,136.57 डॉलर झाला आहे. 2021 मध्ये पुन्हा वाढणार दर तज्ज्ञांच्या मते 2021 मध्ये सोन्याचे दर जबरदस्त वाढण्याची शक्यता आहे. मार्केट एक्सपर्टचे असे म्हणणे आहे की, जर सोन्याच्या किंमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली तर हे दर 63,000 रुपये प्रति तोळाचा स्तर पार करण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात