31 मार्चपूर्वीच पूर्ण करा पॅन, जीएसटी आणि FD संबधित ही 7 कामं; अन्यथा बसेल मोठा फटका

31 मार्चपूर्वीच पूर्ण करा पॅन, जीएसटी आणि FD संबधित ही 7 कामं; अन्यथा बसेल मोठा फटका

1 एप्रिल 2021 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल. त्यामुळं 31 मार्चपूर्वी काही महत्त्वाची अर्थविषयक कामं पूर्ण करणं अत्यावश्यक आहे. अन्यथा नुकसान होऊ शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 मार्च: 1 एप्रिल 2021 पासून नवीन आर्थिक वर्ष (New Financial Year) सुरू होईल. त्यामुळे 31 मार्चपूर्वी काही महत्त्वाची आर्थिक कामं (Financial Works) पूर्ण करणं अत्यावश्यक आहे. अन्यथा नुकसान होऊ शकतं. नवीन आर्थिक वर्षात काही नियमांमध्ये बदलही होणार आहे. पीएनबी, पीएम किसान आणि विवाद ते विश्वास योजना यांच्याशी संबधित ही काही कामे आहेत.

1. विवाद ते विश्वास योजनेची मुदत 31 मार्चपर्यंत -

केंद्र सरकारच्या विवाद ते विश्वास योजनेअंतर्गत कर भरण्याची (TAX) अखेरची तारीख 31 मार्च 2021 आहे. याद्वारे सरकार प्रलंबित कर प्रकरणं निकालात काढण्याचा प्रयत्न करत आहे. या योजनेअंतर्गत करदात्यांना केवळ वादग्रस्त कर रकमेचा भरणा करायचा आहे. त्यांना व्याज आणि दंडाच्या रकमेवर संपूर्ण सूट दिली जाईल.

2. पंजाब नॅशनल बँक -

अर्थात पीएनबीमध्ये (Punjab National Bank-PNB), ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (United Bank of India) यांचं विलीनीकरण झाल्यानंतर 31 मार्चपासून जुने आयएफएससी कोड (IFSC Codes) काम करणार नाहीत. त्याचबरोबर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांची चेकबुक फक्त 31 मार्च 2021 पर्यंत वैध राहतील. 1 एप्रिलपासून ग्राहकांना नवीन चेकबुक (New ChequeBooks) वापरणं अनिवार्य आहे.

(वाचा - रेल्वेने बंद केले सर्व Emergency Number; आता या एकाच हेल्पलाईन नंबरवर करा तक्रार)

3. केसीसीसाठी अर्ज करणं सोपं -

केंद्र सरकार किसान क्रेडीट कार्ड अर्थात केसीसीचा (Kisan Credit Card-KCC) प्रचार करण्यासाठी आणि डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मोहीम राबवत आहे. आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास जवळच्या बँक शाखेत संपर्क करा. अर्ज केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत किसान क्रेडीट कार्ड मिळेल.

4. स्वस्त गृहकर्जाचा फायदा (Cheap Home loans) -

सध्या देशातील अनेक सरकारी आणि खासगी बँका स्वस्त दराने गृहकर्ज (Cheap Home loans) देत आहेत. मात्र ही सवलत 31 मार्चपर्यंतच उपलब्ध आहे. कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) सर्वात कमी म्हणजे 6.65 टक्के दराने 31 मार्चपर्यंत गृहकर्ज देत आहे. याशिवाय एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एसबीआय आदी बँकाही स्वस्त गृहकर्ज देत आहेत.

5. मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना ज्यादा व्याज -

बँक काही ठराविक मुदतीच्या ठेवींवर (Fix Deposits-FD) ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) अधिक व्याज (Interest) देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर अर्धा टक्का व्याज जास्त मिळतं. स्टेट बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना ही सुविधा देत आहे. यासाठीही 31 मार्च 2021 पर्यंत मुदत आहे.

(वाचा : Women’s Day 2021:Facebookसाठी वापरा या सेफ्टी टिप्स,असं करा आपलं अकाउंट सुरक्षित)

6. जीएसटी रिटर्न फाइलिंग -

आर्थिक वर्ष 2020-2021 साठी वार्षिक वस्तू सेवा कर अर्थात जीएसटी विवरणपत्र (जीएसटी रिटर्न - GST Return) भरण्यासाठीची मुदत सरकारने 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे 31 मार्च अखेर जीएसटी विवरणपत्र भरणं अत्यावश्यक आहे.

7. आधार आणि पॅन जोडण्यासाठी 31 मार्च अंतिम तारीख -

त्याशिवाय आधारकार्ड (Aadhar Card) आणि पॅनकार्ड (Pan card) लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2021 आहे. 31 तारखेपर्यंत पॅनकार्ड आधाराला जोडलं नाही, तर निष्क्रीय केलं जाईल.

First published: March 8, 2021, 9:06 PM IST

ताज्या बातम्या