काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्या अडचणीत वाढ, उन्नावनंतर लखनऊमध्ये FIR दाखल

उन्नाव बलात्कार प्रकरणात दिल्लीतील तिहार तुरुंगातून शिक्षा भोगून आलेले माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर (Kuldeep Singh Sengar) यांच्या कन्येनं अलका लांबा यांच्याविरुद्ध FIR दाखल केली आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणात दिल्लीतील तिहार तुरुंगातून शिक्षा भोगून आलेले माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर (Kuldeep Singh Sengar) यांच्या कन्येनं अलका लांबा यांच्याविरुद्ध FIR दाखल केली आहे.

  • Share this:
    लखनऊ, 27 मे: काँग्रेस नेत्या अलका लांबा (Congress Leader Alka Lamba) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलका लांबा यांच्याविरुद्ध लखनऊमधील (Lucknow) हजरतगंज पोलिस स्टेशमध्ये एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. या आधी उन्नाव येथे अलका लांबा यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. हेही वाचा.. या घटनेनं तुमच्याही हृदयाला पडेल पिळ, रखरखत्या उन्हात उभं राहून केली ट्रेनची प्रतिक्षा, अखेर... अलका यांच्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) आणि हायकोर्ट (HC) वर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 25 मे रोजी अलका लांबा यांनी ट्वीट केलं होतं. यामुळे त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या बाल कल्याण आणि संरक्षण आयोगाच्या सदस्य डॉ. प्रीति वर्मा यांनी अकला लांबा यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रीति वर्मा म्हणाल्या की, अलका लांबा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. एवढं नाही तर हायकोर्टाच्या न्यायाधिशांच्या प्रतिष्ठेवर सवाल उपस्थित केला. या प्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. हेही वाचा.. लॉकडाऊन संपल्यानंतर काय असेल सरकारचा प्लॅन? महाविकास आघाडीच्या मंत्र्याची बैठक दरम्यान, उन्नाव बलात्कार प्रकरणात दिल्लीतील तिहार तुरुंगातून शिक्षा भोगून आलेले माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर (Kuldeep Singh Sengar) यांच्या कन्येनं अलका लांबा यांच्याविरुद्ध FIR दाखल केली आहे. सेंगर यांच्या मुलीने उन्नावचे पोलिस अधीक्षक यांची भेट घेतली होती. अलका लांबा यांनी केलेल्या ट्वीटच्या आधारावर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
    First published: