मराठी बातम्या /बातम्या /मनी /इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्कशिवाय होणार पेमेंट, RBI ची ऑफलाइन डिजिटल पेमेंटला मंजुरी

इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्कशिवाय होणार पेमेंट, RBI ची ऑफलाइन डिजिटल पेमेंटला मंजुरी

Offline Digital Payments : गावागावात आणि दूर्गम परिसरात डिजिटल ट्रान्झॅक्शनचा (Digital Transaction) प्रसार करण्यासाठी रिझर्व्ह बँक सोमवारी ऑफलाइन डिजिटल पेमेंट्स (Offline Digital Payments) बाबत एक रुपरेषा जारी केली आहे.

मुंबई, 04 जानेवारी: गावागावात आणि दूर्गम परिसरात डिजिटल ट्रान्झॅक्शनचा (Digital Transaction) प्रसार करण्यासाठी रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India Latest News) सोमवारी ऑफलाइन डिजिटल पेमेंट्स (Offline Digital Payments) बाबत एक रुपरेषा जारी केली आहे. ऑफलाइन पेमेंटअंतर्गत सध्या 200 रुपयांपर्यंत एक ट्रान्झॅक्शन करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त 10 ट्रान्झॅक्शन अर्थात एकूण 2000 रुपयांपर्यंतच्या ट्रान्झॅक्शनची मर्यादा असेल.

ऑफलाइन डिजिटल पेमेंट्सचा अर्थ असा की असे ट्रान्झॅक्शन ज्याकरता इंटरनेट किंवा मोबाइल नेटवर्कची आवश्यकता असणार नाही. ऑफलाइन पद्धतीचे पेमेंट समोरासमोर कार्ड, वॉलेट आणि मोबाइलसह कोणत्याही मार्गाने करता येऊ शकेल.

AFA ची आवश्यकता नाही

आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, या प्रकारच्या ट्रान्झॅक्शनसाठी 'अॅडिशन फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन'ची आवश्यकता नाही. आरबीआयने असे म्हटले आहे की, यामध्ये पेमेंट ऑफलाइन होत असल्याने ग्राहकांना एसएमएस किंवा ईमेलद्वारे मिळणारा अलर्ट थोड्या उशिराने मिळेल.

हे वाचा-नवीन वर्षात नाही उतरले इंधनाचे भाव, आज पेट्रोलसाठी किती मोजावी लागेल किंमत?

ऑफलाइन पद्धतीने केल्या जाणाऱ्या या कमी मूल्याच्या डिजिटल पेमेंट सुविधेच्या रूपरेषेनुसार, 'प्रत्येक व्यवहारासाठी 200 रुपयांची मर्यादा असेल. त्याची एकूण मर्यादा 2,000 रुपये असेल.' मध्यवर्ती बँकेने सांगितले की, ऑफलाइन पेमेंट प्रायोगिक तत्त्वावर सप्टेंबर 2020 ते जून 2021 पर्यंत देशाच्या विविध भागांमध्ये सुरू करण्यात आले होते. मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे हा आराखडा तयार करण्यात आला आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 'ऑफलाइन पेमेंटमुळे खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल. विशेषतः गावे आणि छोट्या शहरांमध्ये. ही व्यवस्था तात्काळ लागू झाली आहे.' ग्राहकांच्या परवानगीनंतरच ऑफलाइन पेमेंटचा वापर करता येईल, असे केंद्रीय बँकेने स्पष्ट केले आहे.

First published:
top videos

    Tags: Rbi, Rbi latest news