Home /News /money /

शेअर बाजारात उडी घेण्याचा विचार करताय? वाचा Zerodha संस्थापक नितीन कामत यांच्या यांच्या टिप्स

शेअर बाजारात उडी घेण्याचा विचार करताय? वाचा Zerodha संस्थापक नितीन कामत यांच्या यांच्या टिप्स

शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांसाठी झिरोधा (Zerodha) या ट्रेडिंग कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नितीन कामत (Nitin Kamath) यांनी काही टिप्स दिल्या आहेत.

मुंबई, 04 जानेवारी: पैशांच्या योग्य गुंतवणुकीसाठी, किंवा मग झटपट पैसे कमावण्यासाठी म्हणून बरेच लोक शेअर मार्केटकडे (Share Market) वळतात. मात्र योग्य अभ्यास किंवा पुरेसा अनुभव नसल्यामुळे कित्येकांच्या पदरी निराशाच पडते. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला (Share Market tips) घेणं आवश्यक असतं. त्यामुळेच शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांसाठी झिरोधा (Zerodha) या ट्रेडिंग कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नितीन कामत (Nitin Kamath) यांनी काही टिप्स दिल्या आहेत. ट्रेडमधून बाहेर कधी पडायचं? नितीन सांगतात, 'एक स्मार्ट इन्व्हेस्टर तोच असतो, ज्याला एखाद्या ट्रेडमधून बाहेर कधी पडायचं. म्हणजेच तो शेअर नेमका कधी विकायचा (When to sell a share) हे माहिती असतं. गुंतवणूकदाराला आपला स्टॉपलॉस आणि आपण किती नुकसान सहन करू शकतो ती रक्कम नीट समजली पाहिजे. यासोबतच नफ्यासाठी आपण किती वेळ थांबावं याची माहितीही त्याला असायला हवी. एखाद्या ट्रेडमध्ये मोठं नुकसान होत असल्याचं दिसू लागल्यावर आपण गडबडून काहीतरी विचित्र निर्णय घेतो. मात्र अशा वेळी शांत राहून विचार करणं गरजेचं आहे. आपल्या एकूण ट्रेडिंग कॅपिटलच्या एक टक्का रक्कम आपण गमवू शकतो. त्याहून जास्त गमवू नये.' हे वाचा-नवीन वर्षात नाही उतरले इंधनाचे भाव, आज पेट्रोलसाठी किती मोजावी लागेल किंमत? ट्रेंडसोबत चला स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला नेहमी सध्याच्या ट्रेंडनुसार (Follow the trend in share market) वागलं पाहिजे. विविध प्रकारच्या ट्रेंड्समुळे शेअरच्या किंमतीही खाली-वर होत असतात. एखादा शेअर जर वर जात असेल. तर तो पुढे आणखी काही दिवस वर राहण्याची वा आणखी वर जाण्याची शक्यता असते. तसेच, एखादा शेअर जर खाली जात असेल, तर पुढे तो आणखी पडण्याची शक्यता असते. अशा वेळी खाली जाणाऱ्या शेअरमधून तातडीने पैसे काढून तुम्ही आणखी नुकसान टाळू शकता. तसेच, कित्येकांना वाटतं की शेअरची किंमत कमी झाली आहे, तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी हा शेअर विकत घेऊन ठेवू. मात्र अशा वेळी हा तोट्याचा सौदा ठरू शकतो, असा इशाराही नितीन यांनी दिला. लिव्हरेज म्हणजे धोक्याची घंटा एकाच ट्रेडमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून, मोठा नफा मिळवण्याची आयडिया सर्वांनाच आकर्षित (Don’t fall for Leverage) करते. मात्र असं केल्यास कित्येकांना मोठ्या प्रमाणात नुकसानालाही सामोरं जावं लागतं. कित्येक लोक यामुळेच पुन्हा शेअर मार्केटकडे फिरकत नाहीत. त्यामुळे लिव्हरेज टाळण्याचाच प्रयत्न करा. अर्थात, जर तुम्ही प्रयोग म्हणून लिव्हरेज करणार असाल, तर स्टॉपलॉसची (Stop Loss) काळजी घेऊन तुम्ही नक्कीच लिव्हरेज घेऊ शकता. हे वाचा-IPO येण्याआधी OYO चे 330 कोटींच्या शेअरची कर्मचाऱ्यांकडून खरेदी ‘टिप्स’ पासून सावधान कित्येक लोक आपले मित्र, ओळखीचे लोक किंवा प्रोफेशनल म्हणवणाऱ्या लोकांकडून लवकर पैसे कमावण्यासाठी टिप्स घेतात. मात्र. या टिप्स अगदी क्वचितच काम करतात. त्यातच सोशल मीडियावर दिल्या जाणाऱ्या टिप्स या तर बऱ्याच वेळा स्कॅम ठरतात. त्यामुळे तुम्हाला अशा मोफत मिळणाऱ्या टिप्स (Avoid free tips) शक्य तितक्या टाळता यायला हव्यात. अशा प्रकारे मार्केटचा योग्य अभ्यास आणि नितीन यांनी दिलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही काही दिवसांमध्येच शेअर मार्केट एक्सपर्ट होऊ शकता.
First published:

Tags: Investment, Money, Share market

पुढील बातम्या