जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: 9000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, इथे तपासा प्रति तोळ्याचा भाव

Gold Price Today: 9000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, इथे तपासा प्रति तोळ्याचा भाव

Gold Price Today

Gold Price Today

आज सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली आहे. एमसीएक्सवर ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 46518 रुपये प्रति तोळाच्या स्तरावर आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 30 जून: सोनेखरेदी करणाऱ्यांसाठी (Gold Price) आनंदाची बातमी आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या दरात (Gold Price Today) आज घसरण पाहायला मिळाली आहे. एमसीएक्सवर ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 46518 रुपये प्रति तोळा या स्तरावर आहे. आज चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर (Silver Price Today) 0.16 टक्क्याने वाढून 68381 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. सोन्याचे दर ऑल टाइम हाय रेट्सच्या स्तरावरून जवळपास 9000 रुपयांनी कमी आहेत. अर्थात तुम्ही साधारण 9000 रुपये स्वस्त दराने सोन्याची खरेदी करू शकता. आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचे झाले तर याठिकाणी देखील सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याचे दर कमी होऊन 1,763.63 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. ही गेल्या चार वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते, 30 जून 2021 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर विविध शहरात वेगवेगळे आहेत. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 46900 रुपये प्रति तोळा आहे. नवी दिल्लीमध्ये हा दर 50080 रुपये, चेन्नईमध्ये 48100 रुपये, कोलकातामध्ये 49120 रुपये, हैदराबादमध्ये 47730 रुपये आणि जयपूरमध्ये 50080 रुपये प्रति तोळा आहे. हे वाचा- उद्यापासून बदलणार बँकिंग, टॅक्ससंदर्भातील हे नियम; जाणून घ्या काय आहेत हे बदल IBJA नुसार सोन्याचे भाव इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइट (ibjarates.com) नुसार शुद्ध सोन्याचा (999) भाव 4677 रुपये, 22 कॅरेटचा 4518 रुपये, 18 कॅरेटचा भाव 3742 रुपये प्रति 1 ग्रॅम आहे. आयबीजेएचे दर देशभरात सर्वमान्य असतात. दरम्यान या वेबसाइटवर देण्यात आलेल्या दरामध्ये जीएसटीचा समावेश नाही आहे.

जाहिरात

मिस्ड कॉल देऊन माहित करून घ्या सोन्याचा भाव तुम्ही घरबसल्या सोन्याच्या दराची माहिती करून घेऊ शकता. याकरता तुम्हाला केवळ 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर दरासंदर्भात मेसेज येईल. त्याद्वारे तुम्ही आजचा लेटेस्ट भाव तपासू शकता. हे वाचा- या महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळू शकतो वाढीव DA! असं होईल कॅलक्यूलेशन काय आहे तज्ज्ञांचं मत? जाणकारांच्या मते, या वर्षअखेरपर्यंत सोन्याचे दर रेकॉर्ड तोडून 60 हजार रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचू शकतात. अशावेळी गुंतवणुकदार चांगला फायदा कमावू शकतात. सोन्यामधील गुंतवणुकीबाबत बोलायचं झालं तर गेल्यावर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न दिला आहे. तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सध्या सोनंखरेदीसाठी उत्तम वेळ आहे आणि सोनं हा एक चांगला पर्याय देखील आहे, ज्यामध्ये चांगला रिटर्न मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात