मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Festive Season: आधी शॉपिंग पेमेंट काही दिवसांनी! ऑनलाइन खरेदीत Credit Card ला पर्याय ठरतेय ही सुविधा

Festive Season: आधी शॉपिंग पेमेंट काही दिवसांनी! ऑनलाइन खरेदीत Credit Card ला पर्याय ठरतेय ही सुविधा

नवरात्रौत्सवापासून सणासुदीला (Festive Season 2021) सुरुवात होते. दसरा-दिवाळीपर्यंत चालणाऱ्या या सणासुदीच्या कालावधीत ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी कंपन्यांनी जोरदार तयारी केली आहे. ई-कॉमर्स कंपन्या काही खास सुविधा देखील देत आहेत

नवरात्रौत्सवापासून सणासुदीला (Festive Season 2021) सुरुवात होते. दसरा-दिवाळीपर्यंत चालणाऱ्या या सणासुदीच्या कालावधीत ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी कंपन्यांनी जोरदार तयारी केली आहे. ई-कॉमर्स कंपन्या काही खास सुविधा देखील देत आहेत

नवरात्रौत्सवापासून सणासुदीला (Festive Season 2021) सुरुवात होते. दसरा-दिवाळीपर्यंत चालणाऱ्या या सणासुदीच्या कालावधीत ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी कंपन्यांनी जोरदार तयारी केली आहे. ई-कॉमर्स कंपन्या काही खास सुविधा देखील देत आहेत

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर: नवरात्रौत्सवापासून सणासुदीला (Festive Season 2021) सुरुवात होते. दसरा-दिवाळीपर्यंत चालणाऱ्या या सणासुदीच्या कालावधीत ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी कंपन्यांनी जोरदार तयारी केली आहे. खासकरून ई-कॉमर्स कंपन्यांनी (E-Commerce Companies offers) आपल्या वार्षिक सेलमध्ये स्पेशल ऑफर्सचा समावेश केला आहे. अॅमेझॉन (Amazon Festive Season Offers) आणि फ्लिपकार्टने (Flipkart Festive Season Offers) त्यांच्या वार्षिक सेलमध्ये बाय नाऊ पे लॅटर (Buy Now Pay Later -BPNL) ही स्कीम सुरू केली आहे. ही स्कीम क्रेडिट कार्डला (Credit Card) पर्याय ठरत आहे. सेलमध्ये बऱ्याचदा ग्राहक रोख रकमेऐवजी क्रेडिट कार्डाचा वापर करतात आणि आवश्यक सामान किंवा वस्तू मासिक हप्त्यावर खरेदी करतात; मात्र ज्या ग्राहकांकडे रोख रक्कम आणि क्रेडिट कार्ड नाही त्यांच्यासाठी बाय नाऊ पे लॅटर म्हणजेच बीपीएनएल ही स्कीम फायदेशीर ठरते. त्यामुळे क्रेडिट कार्ड आणि बीपीएनएलमध्ये कोणता पर्याय हा अधिक फायदेशीर आहे ते जाणून घेऊ या...

'बाय नाऊ पे लेटर'चे प्रमाण वेगाने वाढतेय

ई-कॉमर्स कंपन्या या दोन्ही सुविधा कर्ज वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या मदतीनं उपलब्ध करून देतात. कोरोनाकाळात याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेक वेळा तर क्रेडिट कार्ड असूनही बीपीएनएलचा वापर ग्राहक करताना दिसतात. 'गोल्डमन सॅक्स'ने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन पेमेंट प्रणालीतलं हे माध्यम मोठ्या वेगाने विस्तारत आहे. 2020 मध्ये याचा वाटा 3 टक्के होता, तो 2024 पर्यंत 9 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.

वाचा-तुम्हाला आलाय हा SMS किंवा ईमेल तर वेळीच व्हा सावध! बुडेल तुमच्या कष्टाची कमाई

'बीपीएनएल'च्या माध्यमातून मिळते व्याजमुक्त कर्ज

बाय नाऊ पे लॅटर हा तत्काळ कर्ज मिळवण्याचा एक पर्याय आहे. हे कर्ज असं असतं, की त्यात ग्राहकाला व्याज भरावं लागत नाही. ई-कॉमर्स उद्योगांचे निरीक्षक राहुल सिंह यांनी सांगितलं, की 'यात ग्राहकाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी केल्यावर एक रुपयाचंही पेमेंट करावं लागत नाही. तसंच यात पेमेंटसाठी खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत.'

'बॅंकबाजार'चे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज बन्सल यांनी सांगितलं, की 'ही सुविधा सुरू करताना संबंधित ग्राहकाला एकदाच केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. बीपीएनएलची सुविधा देणारी कंपनी किंवा संस्था ही सुविधा उपलब्ध करून देण्यापूर्वी ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट प्रोफाईल तपासू शकते'. सध्या ही सुविधा लेझीपे, कॅपिटल फ्लोट, जेस्टमन यांसारख्या कंपन्या देत आहेत.

लहान-मोठी कामं करणाऱ्यांसाठी 'बीपीएनएल' सुविधा

सामान्यतः ज्यांचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) म्हणजेच सिबिल चांगला आहे, अशा ग्राहकांना क्रेडिट कार्ड दिलं जातं. मात्र लहान-मोठी क्रेडिट हिस्ट्री (Credit History) असणारे युवक आणि अनियमित उत्पन्न गटासह लहान-मोठी कामं करणाऱ्यांना बीपीएनएल सुविधा मिळू शकते. ही सुविधा अत्यंत कमी वेळात सुरू करता येते. त्यामुळे युवक, डिजिटल जगतातल्या जाणकार ग्राहकांना बीपीएनएल हा खरेदीसाठी चांगला पर्याय ठरू पाहत आहे. हे ग्राहक आवश्यक साहित्य खरेदीसाठी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

वाचा-रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी! 78 दिवसांच्या पगाराइतका मिळणार बोनस

...तरीही क्रेडिट कार्डइतकी फायदेशीर नाही

बहुतांश रिटेलर सध्या हा पर्याय उपलब्ध करून देत आहेत. तसंच वेगवेगळे ऑनलाइन-ऑफलाइन रिटेलर विविध कर्ज वितरण करणाऱ्या कंपन्याच्या मदतीनं ही सुविधा उपलब्ध करून देत आहेत. या सुविधेच्या तुलनेत क्रेडिट कार्डचा फायदा असा आहे, की एक क्रेडिट कार्ड अनेक रिटेलर्सकडे वापरता येतं. तसंच क्रेडिट कार्डचा वापर खरेदीव्यतिरिक्त अन्य पेमेंटसाठीही केला जाऊ शकतो.

रिवॉर्ड पॉईंट किंवा कॅशबॅकसारख्या ऑफर नाहीत; पण व्याजाचा दर कमी

क्रेडिट कार्डमध्ये रिवॉर्ड ( Reward), प्रमोशनल ऑफर, कॅशबॅक (Cashback) आदी फायदे मिळतात. परंतु बाय नाऊ पे लॅटर या सुविधेत हे फायदे मिळत नाहीत. बीपीएनएलमध्ये सर्वसामान्यपणे रक्कम चुकती करण्यासाठी तुम्हाला 14 ते 15 दिवसांचा कालावधी मिळतो. त्यानंतर 0 ते 26 टक्के व्याजदर लागू होतो. क्रेडिट कार्डमध्ये तुम्हाला पेमेंटसाठी 30 ते 40 दिवसांचा कालावधी मिळतो. त्यानंतर 24 ते 48 टक्के प्रतिवर्ष अशी व्याजवसुली सुरू होते.

रिवॉर्ड हवं असल्यास क्रेडिट कार्डचा वापर योग्य

कमी क्रेडिट स्कोअर किंवा छोट्या क्रेडिट हिस्ट्रीमुळे तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळत नसेल, तर बीपीएनएल हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट कमावयचे असतील तर क्रेडिट कार्ड योग्य आहे; मात्र जे क्रेडिट कार्डचा वापर न करता काही कालावधीनंतर पेमेंट करू इच्छित असतील तर असे ग्राहक बीपीएनएलचा पर्याय निवडू शकतात; मात्र बाय नाऊ पे लॅटरचा पर्याय निवडण्यापूर्वी क्रेडिट चेक कसं केलं जातं ते तपासा. कोणत्याही बीपीएनएल सुविधेची तुम्ही निवड कराल, तेव्हा ही सुविधा देणारे ब्युरोमार्फत तुमची चौकशी करू शकतात. यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरला फटका बसू शकतो.

First published:

Tags: Amazon, Flipkart, Money, Online shopping