मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SIP सुरु करण्याचा विचार करताय? मग कधीच करू नका 'या' चुका; अन्यथा होईल मोठं नुकसान

SIP सुरु करण्याचा विचार करताय? मग कधीच करू नका 'या' चुका; अन्यथा होईल मोठं नुकसान

 गुंतवणुकीतली जोखीम (Risk) टाळून चांगला फायदा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीची निवड करतात.

गुंतवणुकीतली जोखीम (Risk) टाळून चांगला फायदा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीची निवड करतात.

गुंतवणुकीतली जोखीम (Risk) टाळून चांगला फायदा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीची निवड करतात.

म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा आता सर्वांच्या परिचयाचा आणि पसंतीचा गुंतवणूक (Investment) पर्याय झाला आहे. म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्यासाठी दरमहा थोडी रक्कम भरण्याचा सर्वांच्या सोयीचा पर्याय उपलब्ध असल्यानं या पर्यायाला म्हणजे एसआयपी (SIP) अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनला सर्वांचं प्राधान्य असतं. शेअर बाजारातल्या (Share Market) गुंतवणुकीतली जोखीम (Risk) टाळून चांगला फायदा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीची निवड करतात.

एसआयपीच्या माध्यमातून आपल्या पसंतीच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं फायदेशीर ठरत असल्याचं सिद्ध झाले आहे; मात्र काही वेळा अपुऱ्या माहितीमुळे गुंतवणूकदार, विशेषत: नवीन गुंतवणूकदार काही चुका करत असल्यानं त्यांना नुकसान सहन करावं लागत असल्याचं आढळतं. अशा चुका कोणत्या आहेत, त्याबद्दल आम्ही आज आपल्याला माहिती देत आहोत. एसआयपी करताना या चुका टाळल्यास नुकसान होणार नाही.

बाजारातील तेजी पाहून गुंतवणूक करू नका :

जेव्हा शेअर बाजारात तेजी (Bullish) असते, तेव्हा त्याचा लाभ मिळवण्यासाठी अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात; पण बाजारात चढ-उतार सुरू असतात. बाजार जितक्या वेगाने वर जातो तितक्या वेगाने खालीही जाऊ शकतो. त्यामुळे बाजार बघून कधीही गुंतवणूक करू नका. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी शिस्त आणि संयमाची गरज असते. त्यामुळे एसआयपीद्वारे एखाद्या फंडात थोडी थोडी रक्कम गुंतवा. यामुळे तुमची जोखीम कमी होते.

हे वाचा - रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी! 78 दिवसांच्या पगाराइतका मिळणार बोनस

बाजारात घसरण झाली म्हणून एसआयपी थांबवू नका :

अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारात (Share Market) घसरण (Bearish) होते तेव्हा एसआयपी थांबवतात आणि तेजी आल्यावर पुन्हा गुंतवणूक सुरू करतात. हे गुंतवणुकीच्या ‘बाय लो अँड सेल हाय’ (BuyLow and Sale High) या मूलभूत सिद्धांताच्या अगदी विरुद्ध आहे. यामुळे गुंतवणूकदार संपूर्ण गुंतवणूक कालावधीत जमा झालेला नफा एका झटक्यात गमावून बसतात. त्यामुळे शेअर बाजारात घसरण होत असली तरी एसआयपी थांबवू नये. योग्य फंडात गुंतवणूक केल्यास नुकसान होणार नाही.

कमी एनएव्ही म्हणजे स्वस्त फंड असा विचार करू नका :

अनेक छोटे गुंतवणूकदार कमी एनएव्ही म्हणजे नेट अॅसेट व्हॅल्‍यू ( Low NAV) असल्यास तो म्युच्युअल फंड स्वस्त आहे म्हणून त्यात एसआयपीद्वारे गुंतवणूक करतात आणि त्यातून उच्च परतावा (High Return) मिळेल अशी अपेक्षा करतात; मात्र हे चुकीचं आहे. फंडाची एनएव्ही जास्त किंवा कमी होण्याची अनेक कारणे असतात. उदाहरणार्थ, एखाद्या फंडाची एनएव्ही (NAV) त्याच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनाखालील बाजारभावावर अवलंबून असते. कोणत्याही चांगल्या व्यवस्थापनाखालील फंडाची एनएव्ही इतर फंडांपेक्षा वेगाने वाढेल. त्याचप्रमाणे, नवीन फंडाची एनएव्ही जुन्या फंडापेक्षा कमी असेल कारण नवीन फंडाला वाढीसाठी कमी वेळ मिळालेला असतो. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी एनएव्हीकडे जास्त लक्ष न देता फंडाची कामगिरी बघणे आवश्यक आहे. तसेच त्याच्या भविष्यातील योजनांचा आढावा घेतला पाहिजे.

गुंतवणुकीसाठी पुरेसा वेळ द्या :

म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली म्हणजे तत्काळ चांगला परतावा मिळेल असं नसतं. काही वर्षी तुम्हाला चांगला परतावा मिळतो, तर काही वर्षी परतावा कमी मिळतो. म्हणून गुंतवणूक थांबवू नका. म्युच्युअल फंडांद्वारे केल्या जाणाऱ्या शेअर्समधल्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळण्यासाठी 5 ते 7 वर्षांचा कालावधी आवश्यक आहे. शेअर्समध्ये दीर्घकाळ गुंतवणूक (Long term Investment) केल्यास चांगला परतावा मिळत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे एखाद्या फंडाची कामगिरी एखाद्या वर्षी चांगली झाली नाही, परतावा चांगला मिळाला नाही, तर लगेच त्यातले पैसे काढू नका.

हे वाचा -सणासुदीत सोनंखरेदीचा गोल्डन चान्स! 10582 रुपयांनी स्वस्त आहे सोनं;तपासा आजचा भाव

एसआयपी मध्येच थांबवू नका :

शेअर बाजारात घसरण झाली की अनेक गुंतवणूकदार एसआयपी थांबवतात (Stops SIP) किंवा फंडातील पैसे काढून घेतात; मात्र घसरत्या बाजारात शेअर्स स्वस्त होतात आणि आपल्यालाही कमी पैशांत अधिक युनिट मिळतात, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. शेअर बाजारात तेजी येते तेव्हा तुमच्या युनिट्सची किंमतही वाढते. त्यामुळे एसआयपी अर्ध्यातच बंद करणं नुकसानदायी ठरतं.

उद्दिष्टाशिवाय गुंतवणूक :

म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची आर्थिक उद्दिष्टं (Financial Goals) स्पष्ट असली पाहिजेत. तरच तुम्ही योग्य निधी निवडू शकाल. उद्दिष्ट स्पष्ट नसेल तर चुकीच्या फंडात गुंतवणूक करण्याची शक्यता अधिक असते.

फंडात वारंवार बदल करू नका :

दुसऱ्याचं बघून तुम्ही तुमची गुंतवणूक करू नका. कारण प्रत्येकाची आर्थिक उद्दिष्टं आणि परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे तुमचं आर्थिक उद्दिष्ट आणि खिशानुसार गुंतवणूक करा. अनेकदा फंडाची आधीची कामगिरी बघून गुंतवणूक केली जाते; पण फंडाचे परतावे बदलत राहतात. प्रत्येक तिमाहीत फंडाचं मूल्य बदलतं. त्यामुळे आधीची कामगिरी प्रमाण मानून गुंतवणूक करणं आणि अपेक्षेप्रमाणे परतावा न मिळाल्यास त्यात बदल करणं नुकसानदायक ठरते.

First published:

Tags: Money