नवी दिल्ली, 10 डिसेंबर: इलेक्ट्रिक कार बनवणारी जगातली सर्वांत मोठी कंपनी म्हणून टेस्लाची (Tesla Latest News) ओळख आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Tesla CEO Elon Musk) यांनी पुन्हा एकदा कंपनीतले आपले शेअर्स विकले आहेत. 9 डिसेंबरला अमेरिकी नियामक संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 96.32 कोटी डॉलर्स किमतीचे तब्बल 9,34,091 शेअर्स विकले (Elon Musk sold Tesla Shares) आहेत. यासोबतच, मस्क सध्या स्टॉक ऑप्शनचा वापर करून 21.7 लाख शेअर्स विकत घेण्याचाही विचार करत आहेत.
कशामुळे आली शेअर्स विकण्याची वेळ?
इलॉन मस्क टेस्लाकडून पगार म्हणून रोख रक्कम नाही, तर स्टॉक ऑप्शन्स (Stock Options) घेतात. यामुळे त्यांना मार्केट प्राइजच्या तब्बल 90 टक्के कमी दराने टेस्लाचे शेअर्स (Tesla Shares) खरेदी करण्याचा हक्क मिळतो. 2012मध्ये टेस्लाने एलॉन मस्क यांना असाच स्टॉक ऑप्शन दिला होता. त्या वेळी 6.24 डॉलर्स प्रति शेअर या दराने कंपनीचे सुमारे 2.28 कोटी शेअर्स विकत घेण्याचा पर्याय मस्क यांच्यासमोर होता. ही ऑफर रिडीम करण्यासाठी मस्क यांना ऑगस्ट 2022 पर्यंतची मुदत देण्यात आली होती.
हे वाचा-बंपर रिटर्न! 10 रुपयांचा शेअर पोहोचला 338 रुपयांवर, 1 लाखाचे झाले 32 लाख
या दरम्यान अमेरिकेत शेअर्ससंबंधी नवीन कायदा अस्तित्वात (America new Tax Law) आला. या कायद्यानुसार सर्व शेअर्सची खरेदी किंमत आणि मूळ किंमत यामध्ये असलेल्या फरकावर जो लाभ होईल, त्यातली 50 टक्के रक्कम टॅक्स स्वरूपात द्यावी लागणार आहे. एलॉन आत्ता आपली ऑफर रिडीम करत आहेत; पण कंपनीचे शेअर्स विकत घेतानाच 50 टक्के रक्कम करस्वरूपात (Elon paying Tax) भरावी लागणार आहे. ही रक्कम भरण्यासाठीच मस्क मोठ्या प्रमाणात शेअर्स विकत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
यापूर्वीही केली होती शेअर्सची विक्री
यापूर्वी 6 नोव्हेंबरला मस्क यांनी ट्विटरवर विचारलं होतं, की त्यांनी कंपनीतली 10 टक्के भागीदारी विकायला हवी का? (Elon musk twitter poll) त्यावर बहुतांश जणांनी शेअर्स विक्रीच्या बाजूने आपलं मत व्यक्त केल्यानंतर मस्क यांनी 24 नोव्हेंबरला टेस्लाचे सुमारे 1.05 अब्ज डॉलर्स किंमतीचे शेअर्स विकले होते. यानंतर एलॉन यांनी आतापर्यंत कंपनीचे एकूण 92 लाख शेअर्स विकले आहेत. या सर्व शेअर्सची एकूण किंमत 9.9 अब्ज डॉलर्स असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे वाचा-पर्सनल लोनवर SBI देतंय खास सूट, केवळ 4 स्टेप्समध्ये खात्यात जमा होतील पैसे
त्यानंतर आता पुन्हा टॅक्सची रक्कम चुकती करण्यासाठी एलॉन यांनी कंपनीचे सुमारे 9.34 लाख शेअर्स विकले आहेत. दरम्यान, अमेरिकेत या नव्या कराबाबत विधेयक मांडण्यात आल्यानंतर एलॉन आणि इतर अनेक अब्जाधीशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Elon musk