मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अमिताभ बच्चन यांच्या अंधेरीतील Duplex Flat मध्ये राहणार 'ही' अभिनेत्री, देणार इतकं लाख भाडं

अमिताभ बच्चन यांच्या अंधेरीतील Duplex Flat मध्ये राहणार 'ही' अभिनेत्री, देणार इतकं लाख भाडं

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan

बॉलिवूड महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मुंबईतला आपला एक डुप्लेक्स फ्लॅट दोन वर्षांसाठी भाड्याने ( rented) दिला आहे. अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला रोडवरच्या अटलांटिस बिल्डिंगच्या 27 आणि 28 व्या मजल्यावर हे अपार्टमेंट आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 10 डिसेंबर: बॉलिवूड महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अभिनेत्री क्रिती सॅनॉन (Kriti Sanon) हिला मुंबईतला आपला एक डुप्लेक्स फ्लॅट दोन वर्षांसाठी भाड्याने ( rented) दिला आहे. या फ्लॅटचं क्रिती महिन्याला तब्बल 10 लाख रुपये भाडं देणार आहे. इंडेक्स टॅप डॉट कॉमकडून ( indextap.com) प्राप्त झालेल्या रजिस्टर्ड रेंट अॅग्रीमेंटमध्ये ( registered rent agreement) ही माहिती देण्यात आली आहे. अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला रोडवरच्या अटलांटिस बिल्डिंगच्या 27 आणि 28 व्या मजल्यावर हे अपार्टमेंट आहे.

सॅनॉनने 60 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट ( security deposit) ठेवलं आहे. 12 नोव्हेंबर रोजी लिव्ह अँड लायसेन्स अॅग्रीमेंट ( leave and license agreement) झालं. कागदपत्रांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या लीजची मुदत 16 ऑक्टोबर 2021 ते 15 ऑक्टोबर 2023पर्यंत म्हणजेच 24 महिन्यांसाठी आहे; मात्र अमिताभ बच्चन आणि क्रिती या दोघांकडूनही याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही.

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रितीने 2014 मध्ये तेलुगू सायकॉलॉजिकल थ्रिलर 'नेनोक्काडिन'मधून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 'बरेली की बर्फी', 'लुका छुपी', 'मिमी' आणि 'हम दो हमारे दो' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे.

डिसेंबर 2020 मध्ये बच्चन यांनी क्रिस्टल ग्रुप या टियर 2 बिल्डरच्या माध्यमातून अटलांटिसमध्ये 5184 चौरस फुटांची प्रॉपर्टी 31 कोटी रुपयांना खरेदी केली होती. ही प्रॉपर्टी एप्रिल 2021 मध्ये नोंदणीकृत झाली होती. त्यांनी 31 मार्च 2021 पर्यंत असणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या 2 टक्के मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेऊन 31 कोटी रुपयांचे 2 टक्के मुद्रांक शुल्क म्हणजेच 62 लाख रुपये भरले होते.

हेही वाचा-  हार्ट अटॅक कसा येतो? जॉन अब्राहमने पाजळलं ज्ञान; मेडिकलचे विद्यार्थीही शॉक, Video Viral

त्या भागात व्यवसाय करणारे प्रॉपर्टी ब्रोकर्स आणि रिअल इस्टेट एजंट्सच्या म्हणण्यानुसार, 'अमिताभ बच्चन यांनी येथे प्रॉपर्टी खरेदी केल्यामुळे प्रति चौरस फूट मूल्य सुमारे 60,000 रुपये झाले. या भागात प्रॉपर्टीची किंमत 60 हजार रुपये प्रति चौरस फूट आहे.' अभिनेत्री सनी लिओनीने त्याच प्रोजेक्टमध्ये 12व्या मजल्यावरील अपार्टमेंटची नोंदणी केली होती. ती तिने 28 मार्च 2021 रोजी 16 कोटी रुपयांना खरेदी केली. 'तनू वेड्स मनू' आणि 'झिरो'सारख्या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटांसाठी ओळखले जाणारे बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता आनंद एल. राय यांनीही याच प्रोजेक्टमध्ये एक डुप्लेक्स अपार्टमेंट विकत घेतलं आहे. एका स्थानिक ब्रोकरने सांगितलं, की 'क्रिस्टल प्राइड डेव्हलपर्सच्या अटलांटिस प्रोजेक्टमध्ये केवळ 34 अपार्टमेंट्स आहेत.'

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

बच्चन आणि त्यांचा अभिनेता मुलगा अभिषेक यांनी मुंबईत जुहू येथील 'वत्स' आणि 'अम्मू' बंगल्याचा तळमजला स्टेट बँक ऑफ इंडियाला 15 वर्षांसाठी 18.9 लाख रुपये प्रति महिना याप्रमाणे सप्टेंबर 2021 मध्ये भाड्याने दिला. दोन्ही बंगले 'जलसा'सारखेच आहेत, बच्चन कुटुंब सध्या 'जलसा' बंगल्यात राहते.

First published:

Tags: Amitabh Bachchan