• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: अक्षय्य तृतीयेदिवशी उतरलं सोनं, सातत्याने कमी होतायंत किंमती; हा आहे नवा दर

Gold Price Today: अक्षय्य तृतीयेदिवशी उतरलं सोनं, सातत्याने कमी होतायंत किंमती; हा आहे नवा दर

Gold Rates on Akshay Tritiya 2021: अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. आज 14 मे रोजी सोनं स्वस्त झालं आहे

 • Share this:
  नवी दिल्ली, 14 मे: अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2021) शुभ मुहूर्तावर सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Rates Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आज 14 मे रोजी सोनं स्वस्त झालं आहे. आज सोन्याच्या किंमतीत 73 रुपयांची घसरण झाली आहे. यानंतर तुम्ही सोनं 47365 रुपये प्रति तोळा या दराने खरेदी करू शकता. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange MCX) जूनच्या डिलिव्हरीचे दर 70 रुपयांच्या घसरणीने सुरू झाले होते. सुरुवातील झालेली घसरण आज MCX वर कायम होती, यामध्ये सुधारणा झाली नाही. सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास 73 रुपये अर्थात 0.15 टक्क्यांच्या घसरणीनंतर सोन्याचे दर 47365 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होते. आधीच्या सत्रात हे दर 47438 रुपयांवर बंद झाले होते. आज मार्केट उघडताना सोन्याचे दर 47368 रुपये होते. आज सकाळी सोन्याच्या दराने 47343 रुपये ही निचांकी 47400 रुपये ही उच्चतम पातळी गाठली होती. ऑगस्टच्या डिलिव्हरीचं सोनं देखील 47869 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होतं. हे वाचा- Akshay Tritiya: मुहूर्तावर करा सोन्यामध्ये गुंतवणूक, नफा मिळवण्याची सुवर्णसंधी चांदीच्या दरातही घसरण आज चांदीच्या दरातही (Silver Price Today) घसरण पाहायला मिळाली आहे. सकाळी दहा वाजता जुलैच्या डिलिव्हरीचे चांदीचे दर 103 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. या घसरणीनंतर चांदी 70370 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होती. सप्टेंबरच्या डिलिव्हरीच्या चांदीमध्ये देखील 87 रुपयांची घसरण होऊन दर 71515 रुपयांवर ट्रेड होत होता. हे वाचा-कोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर ब्लूमबर्गच्या मते कॉमेक्सवर जून, 2021 च्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.10 डॉलर अर्थात 0.01 टक्क्याने वधारले आहेत. यानंतर सोन्याचे भाव 1,824.10 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होते. या प्रकारे याठिकाणी स्पॉट गोल्डची किंमत 3.65 डॉलर अर्थात 0.20 टक्क्याने कमी झाली आहे. या घसरणीनंतर दर 1,823.07 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: