मराठी बातम्या /बातम्या /मनी /कोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा, हे आहे कारण; पाहा लोनसाठीचे इतर पर्याय

कोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा, हे आहे कारण; पाहा लोनसाठीचे इतर पर्याय

जर अचानक पैशांची गरज पडली, तर सामान्य नागरिक कर्ज घेण्याचा विचार करतात. त्यात पर्सनल लोन (Personal Loan) आणि क्रेडीट कार्डवरील लोनचा (Credit Card Loan) विचार प्राधान्याने होतो.

जर अचानक पैशांची गरज पडली, तर सामान्य नागरिक कर्ज घेण्याचा विचार करतात. त्यात पर्सनल लोन (Personal Loan) आणि क्रेडीट कार्डवरील लोनचा (Credit Card Loan) विचार प्राधान्याने होतो.

जर अचानक पैशांची गरज पडली, तर सामान्य नागरिक कर्ज घेण्याचा विचार करतात. त्यात पर्सनल लोन (Personal Loan) आणि क्रेडीट कार्डवरील लोनचा (Credit Card Loan) विचार प्राधान्याने होतो.

  नवी दिल्ली, 14 मे : कोरोनामुळे (Corona) निर्माण झालेल्या परिस्थितीने एकीकडे रोजगार (Employment) आणि कमाईची साधनं अडचणीत आली आहेत, तर दुसरीकडे अनेक कुटुंबांचं आरोग्य विषयक अर्थिक नियोजन बिघडलं आहे. उत्पन्न कमी झालं, असून खर्च वाढत आहे. कोरोनामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. बाजार बंद असल्याने अनेकांचे रोजगार ठप्प असून उत्पन्न देखील थांबलं आहे.

  अशा परिस्थितीत जर अचानक पैशांची गरज पडली, तर सामान्य नागरिक कर्ज घेण्याचा विचार करतात. त्यात पर्सनल लोन (Personal Loan) आणि क्रेडीट कार्डवरील लोनचा (Credit Card Loan) विचार प्राधान्याने होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, क्रेडिट कार्डवरील लोन हे प्राधान्याने मंजूर होतं. अगदी एका दिवसातही हे लोन मिळू शकतं, तर पर्सनल लोन मंजूर व्हायला किमान 3 ते 7 दिवस लागू शकतात. त्यामुळे नागरिक क्रेडिट कार्ड वरील लोन घेण्यास प्राधान्य देतात. परंतु, हे लोन घेताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.

  क्रेडीट कार्डवरील लोन महाग ठरू शकतं -

  पर्सनल लोन देणाऱ्या बॅंका आणि एबीएफसीचा वार्षिक व्याजदर 10 ते 24 टक्के असतो. प्रभावी व्याज दर कर्ज संस्था आणि अर्जदाराच्या प्रोफाईलच्या विविध पैलूंवर अवलंबून असतो. या पैलूंमध्ये क्रेडिट स्कोअर, मासिक उत्पन्न, जॉब प्रोफाईल आणि कंपनी प्रोफाईलचा समावेश असतो. मात्र क्रेडिट कार्डवरील लोन हे खूपच महाग ठरू शकतं. क्रेडिट कार्डवरील लोनसाठी वार्षिक व्याज दर 35 ते 40 टक्के असतो. जी बॅंक तुम्हाला पर्सनल लोनवर वर्षाकाठी 15 टक्के व्याज आकारते, तीच बॅंक क्रेडिट कार्डवर 40 टक्के शुल्क आकारते.

  (वाचा - मोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा)

  पर्सनल लोनची मर्यादा अधिक -

  क्रेडिट कार्डवर पूर्व-मंजूर अर्थात प्री-अप्रूव्ड कर्ज मिळतं. याची रक्कम कमी असते. त्या तुलनेत पर्सनल लोनची रक्कम 50 हजारांपासून ते 25 लाखांपर्यंत असते. त्यामुळे मोठ्या स्वरुपाच्या खर्चांसाठी पर्सनल लोन अधिक उपयुक्त ठरू शकतं. या दोन्ही कर्जांसाठी प्रक्रिया शुल्क (Process Fee) जवळपास सारखंच असते. त्यामुळे लोनच्या रक्कमेत फारसा फरक पडत नाही.

  (वाचा - Work From Home चा कंटाळा आलाय? आता निसर्गाच्या सान्निध्यात काम करण्याची संधी)

  LIC वरील कर्ज हा देखील चांगला पर्याय -

  जर तुम्ही जीवना विमा (Jeevan Vima) घेतला असेल, तर तो तुम्हाला लोन घेण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. एलआयसी (LIC) आपल्या पॉलिसीधारकाला कमी व्याज दराने कर्ज देते. यासाठी तुम्ही दोन वर्षे जुने पॉलिसीधारक असणं आवश्यक आहे. तसंच योग्य वेळी पॉलिसीचा प्रकार सबमिट केलेला असला पाहिजे. कर्जाची रक्कम तुमच्या एलआयसी पॉलिसीच्या आधारे ठरवली जाते. म्हणजेच तुम्हाला किती रक्कम कर्जरूपाने द्यायची हे एलआयसी ठरवते.

  First published:

  Tags: Instant loans, LIC, Loan