Home /News /money /

Gold Price Today: आज दर उतरल्याने सोनेखरेदीची सुवर्णसंधी, चांदीही 1037 रुपयांनी झाली स्वस्त

Gold Price Today: आज दर उतरल्याने सोनेखरेदीची सुवर्णसंधी, चांदीही 1037 रुपयांनी झाली स्वस्त

Gold Silver Price, 5 August 2021: गुरुवारी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली, तर चांदीचे दरही आज कमी झाले आहेत.

    नवी दिल्ली, 05 ऑगस्ट: भारतीय सराफा बाजारात आज 5 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) घसरले आहेत. या घसरणीनंतर सोन्याचे दर 47 हजारांपेक्षा कमी झाले आहेत. तर चांदीचे दरंही (Silver Price Today)आज कमी झाले आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 47,219 रुपये प्रति तोळा होते. तर बाजार बंद होत असताना चांदीचे दर 67,165 रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर देखील कमी झाले आहेत, मात्र चांदीचे दर याठिकाणी स्थिर आहेत. सोन्याचे नवे दर (Gold Price on 05th August 2021) दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 312 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. या घसरणीनंतर सोन्याचे दर 47 हजारांपेक्षा कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,907 रुपये प्रति तोळा झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1,810 डॉलर प्रति औंस झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 48,500 रुपये प्रति तोळाच्या दरम्यान सोन्याचे दर पोहोचतील. यावर्षी सोन्याचे दर 60 हजार रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या असणाऱ्या किंमतीमध्ये सोन्याची खरेदी केल्यास भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. हे वाचा-SBI कडून घेताय Gold Loan? अशाप्रकारे व्याजदरात मिळेल 0.75 टक्क्यांची सूट चांदीचे नवे दर (Silver Price on 05th August 2021) चांदीच्या किंमतीमध्येही आज घसरण पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर गुरुवारी 1,037 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. यानंतर चांदीचे दर 66,128 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल झाले नाहीत. याठिकाणी चांदीचे दर 25.37 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. हे वाचा-ईडीने पाठवली Flipkart ला नोटीस, भरावा लागू शकतो 10000 कोटींचा दंड का उतरले सोन्याचे दर एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य वधारल्यामुळे भारतीय बाजारात सोन्याचे दर उतरले आहेत. याशिवाय न्यूयॉर्क स्थित कमोडिटी एक्सचेंजमध्ये स्पॉट गोल्डचे भाव उतरल्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today

    पुढील बातम्या