जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: स्वस्त सोनेखरेदीची आज संधी, वाचा सोन्याचांदीचा लेटेस्ट भाव

Gold Price Today: स्वस्त सोनेखरेदीची आज संधी, वाचा सोन्याचांदीचा लेटेस्ट भाव

Gold Price Today: स्वस्त सोनेखरेदीची आज संधी, वाचा सोन्याचांदीचा लेटेस्ट भाव

Gold Price Today: मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 4 मे रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा 47,314 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीची वायदे किंमत देखील (Silver Price Today) 0.19 ने कमी होऊन 70763 रुपये प्रति किलो झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 04 मे: सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Rates Today) आज किरकोळ घसरण पाहायला मिळाली.  मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX Multi Comodity Exchange) वर 4 मे रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा 47,314 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याची वायदे किंमत 0.06 टक्क्यांनी अर्थात 27 रुपयांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याची वायदे किंमत (Gold Future) 47,292 रुपये प्रति तोळा या स्तरावर आहे. तर चांदीची वायदे किंमत देखील (Silver Price Today) 0.19 ने अर्थात 137 रुपयांनी कमी होत 70763 रुपये प्रति किलो झाली आहे (Silver Future). इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, सर्वाधिक शुद्धतेच्या स्पॉट गोल्डची किंमत 46,900 रुपये प्रति तोळा आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याचा भाव आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याचा दर घसरला आहे. याठिकाणी स्पॉट गोल्डची किंमत 0.2 टक्क्याने घसरून 1,789.02 डॉलर प्रति औंस झाली आहे. तर चांदीचे दर 0.5 टक्क्यांनी कमी होऊन 26.74 डॉलर प्रति औंस झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज प्लॅटिनमचे दर 0.1 टक्क्याने कमी होऊन 1,228.94 डॉलर झाले आहेत. हे वाचा- धक्कादायक! Lockdown निर्बंधांमुळे एप्रिलमध्ये 75 लाख जणांनी नोकऱ्या गमावल्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 4 मे रोजी असणाऱ्या 24 कॅरेट सोन्याच्या भावाविषयी बोलायचे झाल्यास दिल्लीमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचा दर प्रति तोळा 49780 रुपये होता. तर मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे प्रति तोळा 45370 रुपये, 48250 रुपये आणि 49110 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 4 मे रोजी असणाऱ्या 22 कॅरेट सोन्याच्या भावाविषयी बोलायचे झाल्यास दिल्लीमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचा दर प्रति तोळा 45580 रुपये होता. तर मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे प्रति तोळा 44370 रुपये, 44230 रुपये आणि 46320 रुपये आहे. हे वाचा- Gold Price: सोन्याच्या किंमती वाढत असताना दागिने विकणं ठरेल फायद्याचं? कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात