Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /देश /

धक्कादायक आकडा! Lockdown निर्बंधांमुळे एप्रिलच्या एका महिन्यात देशभरात 75 लाख जणांच्या नोकऱ्यांवर गदा

धक्कादायक आकडा! Lockdown निर्बंधांमुळे एप्रिलच्या एका महिन्यात देशभरात 75 लाख जणांच्या नोकऱ्यांवर गदा

Coronavirus एका बाजूला मृत्यूची घंटा वाजवत आहे, तर दुसरीकडे त्यापासून बचाव करण्यासाठी टाळेबंदी लागली तर पोटावर पाय येत आहे अशी भीषण परिस्थिती देशभरात आहे.

Coronavirus एका बाजूला मृत्यूची घंटा वाजवत आहे, तर दुसरीकडे त्यापासून बचाव करण्यासाठी टाळेबंदी लागली तर पोटावर पाय येत आहे अशी भीषण परिस्थिती देशभरात आहे.

Coronavirus एका बाजूला मृत्यूची घंटा वाजवत आहे, तर दुसरीकडे त्यापासून बचाव करण्यासाठी टाळेबंदी लागली तर पोटावर पाय येत आहे अशी भीषण परिस्थिती देशभरात आहे.

मुंबई, 4 मे: Covid-19 महासाथीच्या दुसऱ्या लाटेचा (Covid Second Wave) प्रभाव देशभरात सर्वत्र दिसतो आहे. ही लाट नियंत्रणात आणण्यासाठी अद्याप देशपातळीवर लॉकडाउन (Lockdown)लागू करण्यात आलेला नाही; मात्र महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांत स्थानिक पातळीवर कडक निर्बंध आणि लॉकडाउन (Lockdown in Maharashtra continues)लादण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे 75 लाखांहून अधिक नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

कोरोनाने मृत्यूची घंटा वाजू लागल्यावर राज्यांनी आपापल्या क्षेत्रात टाळेबंदी लागू केली. आधी जीव महत्त्वाचा या न्यायाने लॉकडाउन लागला. देशभरात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. यामुळे आता  बेरोजगारीचा दर (Unemployment Rate)आठ टक्क्यांवर पोहोचला असून, हा गेल्या चार महिन्यांतला उच्चांक आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE)या संस्थेने सोमवारी (3 मे)याबद्दलची माहिती दिली.

CMIE चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास (CMIE Mahesh Vyas)यांनी सांगितलं, की आगामी काळातही रोजगाराच्या अनुषंगाने स्थिती आव्हानात्मक राहणार असल्याची भीती आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात 75 लाख जणांनी नोकऱ्या गमावल्या. त्यामुळे बेरोजगारीचा दर वाढला आहे, असं ते म्हणाले. PTI या वृत्तसंस्थेशी ते बोलत होते.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय बेरोजगारी दर 7.9 टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरी भागात हा दर 9.78 टक्क्यांवर असून, ग्रामीण भागात तो 7.13 टक्क्यांवर आहे. यापूर्वी मार्च महिन्यात राष्ट्रीय बेरोजगारी दर 6.50 टक्के होता. तसंच, ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांत बेरोजगारीचा दर कमीच होता.

कोविड-19 साथ(Covid19 Pandemic)आटोक्यात आली असं वाटत असतानाच अचानक या साथीने पुन्हा रौद्ररूप धारण केलं. त्यामुळे स्थानिक पातळीवर लॉकडाउन किंवा कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय अनेक राज्य सरकारांनी घेतला. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणं साहजिक होतं. अनेक उद्योगधंद्यांवर परिणाम झाला आणि त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.

Lockdown काळात बाहेर जाण्याची गरज नाही; घरबसल्या बनवा Driving License

'ही स्थिती आणखी किती वरची पातळी गाठणार आहे, याचा अंदाज नाही; मात्र येणारी परिस्थिती रोजगाराच्या अनुषंगाने आव्हानात्मक असेल,यात शंकानाही,' असं व्यास यांनी सांगितलं.

'पहिल्या लॉकडाउनच्या वेळीबेरोजगारी दर 24 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. त्या तुलनेत सध्याची परिस्थिती वाईट नाही,' असंही व्यास यांनी स्पष्ट केलं.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन हा प्रभावी पर्याय नाही, असं मत पहिल्या लॉकडाउननंतर जगभरातल्या अनेक शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं होतं. शिवाय पहिला लॉकडाउन जाहीर केला, तेव्हा औषधं, लस किंवा अन्य कोणताच प्रभावी उपाय हाती नव्हता, त्यामुळे लॉकडाउनला पर्याय नव्हता, असा युक्तिवाद केला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णयाची दिल्लीतही दखल; केजरीवालांची मोठी घोषणा

दरम्यान, गेल्या काही दिवसांत भारतात वाढलेला संसर्गदर पाहता देशव्यापी लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याची स्थिती उद्भवली असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे;  मात्र लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो.त्यामुळे आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी, लसीकरणाचा वेग वाढवावा आणि लॉकडाउन हा अगदीच शेवटचा पर्याय म्हणून वापरला जावा, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Jobs, Unemployment