नवी दिल्ली, 04 मे: सध्या जगभरात सोन्याच्या (Gold Price) भावात तेजी (hike) पाहायला मिळते आहे. भारतीय बाजारपेठेतही सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम मागे 46 हजार 580 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याच्या किंमती वाढत असताना सोन्याचे दागिने किंवा सोन्यातील गुंतवणूक मोडावी का? आता दागिने विकले तर ते फायद्याचे ठरेल का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.यावर तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की, सोन्यातील गुंतवणूक एकदा मोडून फायदा करून घेतला जाऊ शकतो. मात्र या वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा सोने 52 हजार रुपयांवर पोहोचू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तरीही तुम्हाला आता पैशाची आवश्यकता असेल आणि त्यासाठी तुम्ही सोनं विकत असाल तर सोन्याची जास्तीत जास्त किंमत मिळविण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सोन्याचे दागिने विक्री करण्याची****ही योग्य वेळ आहे का**?** काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊन दर प्रति तोळा 43 हजारापर्यंत गेले होते. आता पुन्हा त्यात वाढ दिसत असून सध्या सोन्याचा दर प्रति तोळा 46 हजार रुपये आहे. कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) आणि लग्नाचा हंगाम (Marriage Season) सुरू झाल्यामुळे सोन्याची मागणी वाढू लागली आहे. यामुळे या वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा सोने 52 हजार रुपयांवर पोहोचू शकते,असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. (हे वाचा- निवृत्तीनंतर खात्रीशीर नियमित उत्पन्न हवंय? जाणून घ्या नव्या पेन्शन प्लानविषयी.. ) तुम्हाला दागिने विकायचे असतील तर काही गोष्टी लक्षात****घेणं आवश्यक आहे : तज्ज्ञांच्या मते, ज्वेलर्स (Jewelers) तूट किंवा मेल्टिंग चार्जच्या नावाखाली पैसे कापतात. बर्याचदा असं दिसतं की आपण सोने विकायला जातो तेव्हा दुकानदार किंवा ज्वेलर त्यांच्या अटींनुसार आपल्याकडून सोने खरेदी करतात. तूट किंवा मेल्टिंग चार्जच्या रूपात ते बरीच रक्कम वजा करतात. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या सोन्याच्या किंमतीपैकी केवळ 60 ते 65 टक्केच किंमत मिळते. हे टाळण्यासाठी खालील बाबी लक्षात ठेवा. 1) जेव्हा तुम्ही सोने खरेदी कराल तेव्हा त्याचं बिल जपून ठेवा. यात सोन्याची शुद्धता, किंमत इत्यादी सर्व माहिती आहे. त्यामुळं तुम्ही तुमचं सोनं विकताना मोठी कपात टाळू शकता. बिल नसेल तर ज्वेलर मनमानी करून त्याच्या अटींवर सोने खरेदी करू शकतो,अ सा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. (हे वाचा- सामान्यांना झटका! प. बंगाल निकालानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत उसळी ) 2)तुम्ही जिथून सोनं खरेदी केलं असेल तिथंच ते विकणे फायदेशीर असतं. यामुळं तुम्हाला खरेदी केलेल्या सोन्याच्या जवळपास समान किंमत मिळू शकते. 3)सोने विकण्यापूर्वी बाजारभाव जाणून घ्या. कारण वेगवेगळ्या ज्वेलर्सकडे सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. त्यामुळं चालू दराची माहिती सोन्याची जास्तीत जास्त किंमत मिळविण्यासाठी उपयुक्त ठरते. 4) त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्याकडील सोन्याच्या शुद्धतेबद्दल योग्य माहिती असणं आवश्यक आहे. बहुतेक ज्वेलर्स 91.66 टक्के शुद्धतेचे 22 कॅरेट सोन्याचे खरेदी करणे पसंत करतात. अशा सोन्यावर 915 असा हॉलमार्क असतो. यासाठी जवळच्या हॉलमार्क (Hallmark) केंद्रावर जाऊन आपल्या दागिन्यांची शुद्धता तपासून घ्या आणि तेथून प्रमाणपत्र घ्या. शुद्धता माहित नसेल तर ज्वेलर्स तुमच्याकडील सोन्याची शुद्धता कमी आहे,असं सांगून पैसे कमी करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







