मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price Today: 6 महिन्याच्या निचांकी स्तरावर पोहोचले सोन्याचे दर, जाणून घ्या काय आहे आजचा सोन्याचा भाव

Gold Price Today: 6 महिन्याच्या निचांकी स्तरावर पोहोचले सोन्याचे दर, जाणून घ्या काय आहे आजचा सोन्याचा भाव

एमसीएक्सवर (Gold Rate Today on MCX) आज डिसेंबरच्या सोन्याची वायदे किंमत (Future Gold Price) 0.38 टक्क्यांनी वाढून 45,942 प्रति तोळाच्या आसपास आहे. दरम्यान हा भाव गेल्या सहा महिन्यातील निचांकी भाव आहे

एमसीएक्सवर (Gold Rate Today on MCX) आज डिसेंबरच्या सोन्याची वायदे किंमत (Future Gold Price) 0.38 टक्क्यांनी वाढून 45,942 प्रति तोळाच्या आसपास आहे. दरम्यान हा भाव गेल्या सहा महिन्यातील निचांकी भाव आहे

एमसीएक्सवर (Gold Rate Today on MCX) आज डिसेंबरच्या सोन्याची वायदे किंमत (Future Gold Price) 0.38 टक्क्यांनी वाढून 45,942 प्रति तोळाच्या आसपास आहे. दरम्यान हा भाव गेल्या सहा महिन्यातील निचांकी भाव आहे

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर: सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) आज काहीशी तेजी पाहायला मिळाळी आहे. एमसीएक्सवर (Gold Rate Today on MCX) आज डिसेंबरच्या सोन्याची वायदे किंमत (Future Gold Price) 0.38 टक्क्यांनी वाढून 45,942 प्रति तोळाच्या आसपास आहे. दरम्यान हा भाव गेल्या सहा महिन्यातील निचांकी भाव आहे. तर चांदीचे दर (Silver Rate Today) 0.18% नी वाढून 58,490 प्रति किलोग्रावर आहेत. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 0.4% नी कमी झाले होते. तर चांदीचे दर (Silver Price Today) 3.5% अर्थात 2,000 प्रति किलोग्रामने कमी झाले होते.

जागतिक बाजारात, सोन्याच्या किंमती वाढल्या पण अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सात-आठवड्यांच्या निचांकावरच दर आहेत. बुधवारी, स्पॉट सोने 0.2% वाढून 1,729.83 डॉलर प्रति औंस झाले. डॉलर निर्देशांक आज किंचित घसरला, परंतु बुधवारी एका वर्षाच्या उच्चांकावर राहिला होता, ज्यामुळे इतर चलनांमध्ये खरेदीदारांसाठी सोन्याची किंमत वाढली.

हे वाचा-सणासुदीत SBI ची ग्राहकांसाठी खास ऑफर; खरेदीवर 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक आणि...

शेअरसारखे खरेदी करता येईल सोनं

मार्केट रेग्युलेटर सेबीने (SEBI) गोल्ड एक्सचेंज (Gold Exchange) तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. शेअर मार्केटमध्ये ज्याप्रमाणे आपण डिजिटली शेअर खरेदी-विक्री करतो, त्याचप्रमाणे हे गोल्ड एक्स्चेंज काम करेल. यामध्ये लोक सोन्याच्या खरेदी-विक्रीसाठी ऑर्डर देतील. त्यानंतर क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑर्डरनुसार ईजीआर (EGR) आणि फंड्सची सेटलमेंट करेल. या सेटलमेंटनंतर ईजीआर, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (Electronic Gold receipt) हे खरेदीदाराच्या डीमॅट अकाउंटमध्ये जमा होतील.

हे वाचा-बदलायच्या आहेत फाटलेल्या नोटा? बदल्यात बँकांकडून किती मिळतील पैसे; वाचा सविस्तर

तज्ज्ञांच्या मते, देशात लवकरच लाँच होणाऱ्या गोल्ड एक्स्चेंजमुळे सोन्याचे भाव पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. गोल्ड ट्रेडमध्ये पारदर्शकता यावी याकरता एक्सचेंज सुरू करण्याची मागणी वाढत आहे

 

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today