मराठी बातम्या /बातम्या /मनी /सणासुदीत SBI ची ग्राहकांसाठी खास ऑफर; खरेदीवर 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक, पाहा सविस्तर

सणासुदीत SBI ची ग्राहकांसाठी खास ऑफर; खरेदीवर 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक, पाहा सविस्तर

एसबीआय कार्डने (SBI Card) सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी 'दमदार दस' कॅशबॅक ऑफर (Festival Cashback Offer) जाहीर केली आहे. ही ऑफर 3 ऑक्टोबर 2021 पासून 3 दिवसांसाठी असेल.

एसबीआय कार्डने (SBI Card) सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी 'दमदार दस' कॅशबॅक ऑफर (Festival Cashback Offer) जाहीर केली आहे. ही ऑफर 3 ऑक्टोबर 2021 पासून 3 दिवसांसाठी असेल.

एसबीआय कार्डने (SBI Card) सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी 'दमदार दस' कॅशबॅक ऑफर (Festival Cashback Offer) जाहीर केली आहे. ही ऑफर 3 ऑक्टोबर 2021 पासून 3 दिवसांसाठी असेल.

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : भारतातली सर्वांत मोठी क्रेडिट कार्ड कंपनी एसबीआय कार्डने (SBI Card) सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी 'दमदार दस' कॅशबॅक ऑफर (Festival Cashback Offer) जाहीर केली आहे. ही ऑफर 3 ऑक्टोबर 2021 पासून 3 दिवसांसाठी असेल. एसबीआय कार्डने सांगितले की, तीन दिवसांच्या मेगाशॉपिंग फेस्टिव्ह ऑफर अंतर्गत, रिटेल कार्डधारकांना कोणत्याही घरगुती ई-कॉमर्स वेबसाइटवर ऑनलाइन खरेदी करण्याची संधी मिळेल. ऑफर अंतर्गत ग्राहक त्यांच्या खरेदीवर 10 टक्के कॅशबॅक घेऊ शकतात. ही ऑफर ऑनलाईन व्यापारी ईएमआय व्यवहारांवर देखील उपलब्ध असेल.

ग्राहक सुरक्षित आणि सोयीस्कर पद्धतीने पेमेंट करू शकतील

एसबीआय कार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राममोहन राव अमारा म्हणाले, ‘आम्हाला डेटा विश्लेषणामध्ये आढळलं की, कार्डधारक अधिक ऑनलाइन खरेदी करत आहेत. विशेषत: सणासुदीच्या काळात हा ट्रेंड सर्व प्लॅटफॉर्म आणि उत्पादन श्रेणींमध्ये दिसून आला आहे. या ऑफरअंतर्गत कार्डधारक कोणत्याही वेळी सुरक्षित आणि सोयीस्कर पद्धतीनं पेमेंट करू शकतील.’ ते म्हणाले की, SBI कार्डनं या ऑफरद्वारे कार्डधारकांना सोयीस्कर, सुलभ आणि सुरक्षित पेमेंट सोल्यूशन्स (Payment Solution) प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याची बाबही आम्हाला ग्राहकांपर्यंत पोहोचवायची आहे.

हे वाचा - World Heart Day : काळजी घ्या तरुणपणातही हार्ट अटॅक गाठतोय; तज्ज्ञांनी सांगितले हे उपाय

काही श्रेणींवर लागू होणार नाही कॅशबॅक ऑफर

फेस्टिव्ह ऑफर 2021 अधिक आकर्षक करण्यासाठी, SBI कार्डनं अभिनेता जावेद जाफरीसोबत डिजिटल जाहिरात मोहीम सुरू केली आहे. हा कॅशबॅक मोबाईल फोन आणि अॅक्सेसरीज, टीव्ही आणि मोठी उपकरणं, लॅपटॉप आणि टॅब्लेट, होम फर्निशिंग, किचन उपकरणं, फॅशन आणि लाइफस्टाइल, स्पोर्ट आणि फिटनेस यासारख्या उत्पादनांच्या खरेदीवर उपलब्ध असेल. मात्र, ही ऑफर विमा, प्रवास, पाकीट, दागिने, शिक्षण आणि युटिलिटी मर्चंटस् यासारख्या काही श्रेणींमधील ऑनलाइन खर्चावर लागू होणार नाही.

First published:

Tags: SBI, SBI Bank News