मराठी बातम्या /बातम्या /मनी /बदलायच्या आहेत फाटलेल्या नोटा? बदल्यात बँकांकडून किती मिळतील पैसे; वाचा सविस्तर

बदलायच्या आहेत फाटलेल्या नोटा? बदल्यात बँकांकडून किती मिळतील पैसे; वाचा सविस्तर

अनेकदा आपल्याकडे चुकून एखादी फाटकी नोट येऊन जाते किंवा गडबडीत आपल्याकडूनच ही नोट फाटली जाते. तर या फाटलेला नोटा तुम्ही जवळच्या बँकेतून (How to change tampered note in bank) बदलून घेऊ शकता.

अनेकदा आपल्याकडे चुकून एखादी फाटकी नोट येऊन जाते किंवा गडबडीत आपल्याकडूनच ही नोट फाटली जाते. तर या फाटलेला नोटा तुम्ही जवळच्या बँकेतून (How to change tampered note in bank) बदलून घेऊ शकता.

अनेकदा आपल्याकडे चुकून एखादी फाटकी नोट येऊन जाते किंवा गडबडीत आपल्याकडूनच ही नोट फाटली जाते. तर या फाटलेला नोटा तुम्ही जवळच्या बँकेतून (How to change tampered note in bank) बदलून घेऊ शकता.

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर: अनेकदा आपल्याकडे चुकून एखादी फाटकी नोट येऊन जाते किंवा गडबडीत आपल्याकडूनच ही नोट फाटली जाते. तर या फाटलेला नोटा तुम्ही जवळच्या बँकेतून (How to change tampered note in bank) बदलून घेऊ शकता. काही वेळा एटीएमधूनच फाटकी नोट येते. तुम्ही ही बाब बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यास ते तुम्हाला नोट बदलून देतील. यासाठी बँकेकडून नकार दिला जाणार नाही. दरम्यान फाटलेल्या नोटेच्या बदल्यात तुम्हाला किती रक्कम मिळेल असा सवाल अनेकांना पडतो. दरम्यान तुमच्याकडे फाटलेल्या नोटेचा केवढा भाग आहे यावरुन तुम्हाला बँकेकडून मिळणारी (Bank Latest News) रक्कम निश्चित होते. जुन्या विरलेल्या नोटा देखील तुम्ही बँकेतून बदलून घेऊ शकता.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India Rule) माहितीनुसार, कोणतीही बँक जुन्या किंवा फाटलेल्या नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. फक्त अशा नोटा बनावट असू नयेत. नोटा बदलण्यासाठी बँका कोणतेही शुल्क घेत नाही. शिवाय नोट बदलताना तुम्ही त्या बँकेचे ग्राहक असणे आवश्यक नाही. तुम्ही फक्त जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन तुमच्याकडे असलेली फाटलेली नोट बदलू शकता.

वाचा-1ऑक्टोबरपासून बदलणार महत्त्वाचे आर्थिक बदल, LPG ते ऑटो डेबिटचे नियम बदलणार

कोणतीही नोट बदलून देणे बँकेवर अवलंबून आहे. कोणताही ग्राहक बँकेला नोटा बदलण्यास भाग पाडू शकत नाही. बदलण्यात येणाऱ्या नोटेबाबत बँकेला संशय आल्यास बँक ती नोट बदलण्यास नकार देऊ शकते. नोट जाणूनबुजून फाडण्यात आलेली नाही हे देखील बँकेकडून तपासले जातेय बँक नोटेची स्थिती पाहून ती बदलण्यााच निर्णय घेते. आरबीआयच्या नियमांनुसार, मोठ्या प्रमाणात जळलेल्या आणि तुकडे-तुकडे झालेल्या नोटा बदलता येत नाही. अशा नोटा फक्त RBI च्या इश्यू ऑफिसमध्ये जमा करता येतात. RBIच्या नियमांनुसार, 1 ते 20 रुपयांपर्यंतच्या नोटांमध्ये अर्धी रक्कम देण्याची तरतूद नाही, या नोटांची पूर्ण रक्कम दिली जाते. त्याचबरोबर 50-2000 रुपयांच्या नोटा बदलताना त्यांच्या परिस्थितीनुसार अर्धी किंमत देण्याची तरतूद आहे.

First published:
top videos

    Tags: Bank details, Bank services, Bank statement, बँक