• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: दिवाळीच्या काही दिवस आधी महागलं सोनं, वर्षाअखेर चांदी पोहोचणार 82,000 रुपयांवर?

Gold Price Today: दिवाळीच्या काही दिवस आधी महागलं सोनं, वर्षाअखेर चांदी पोहोचणार 82,000 रुपयांवर?

सणासुदीच्या काळात सोनंखरेदी करण्याचा तुमचा विचार असेल (Planning to Buy Gold) तरी ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दिवाळीपूर्वी सोने खरेदी करणे महाग झाले आहे

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: सणासुदीच्या काळात सोनंखरेदी करण्याचा तुमचा विचार असेल (Planning to Buy Gold) तरी ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दिवाळीपूर्वी सोने खरेदी करणे महाग झाले आहे. बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात वाढ (Gold and Silver Price Today) झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर प्रति तोळा सोन्याची किंमत (Gold price today) 93 रुपयांनी म्हणजेच 0.20 टक्के वाढली आहे. या वाढीनंतर आज सोने प्रति तोळा 47,355 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी (silver price today) आज किरकोळ  वाढीसह 64,432 रुपयांवर व्यवहार करत आहे. तज्ज्ञांच्या मते दिवाळी ते डिसेंबर पर्यंत सोन्याची किंमत 57 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात. इंधन दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला, आज पुन्हा वाढले Petrol-Diesel भाव आजचा सोन्याचा भाव गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 47,510 रुपयांवर आहे, कालच्या व्यापार किमतीपेक्षा आज दर 560 रुपयांनी कमी झाला आहे. दरम्यान चांदी कालच्या व्यापार किमतीपेक्षा 600 रुपयांच्या वाढीसह 64,200 रुपये प्रति किलोवर होती. नवी दिल्ली आणि मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा अनुक्रमे 46,450 आणि 46,510 रुपये आहे. वेबसाइटनुसार, चेन्नईमध्ये सोन्याचा दर 44,650 रु. प्रति तोळा आहे. नवी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50,670 रुपये प्रति तोळा आहे. चेन्नईमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचा दर 48,710 रुपयांवर  आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 47,510 रुपये आहे, तर कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 49,550 रुपये आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. Commodity Market : शेअर बाजारातील कमोडिटी ट्रेडिंग काय आहे? अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: