• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today: सोनेखरेदीची सुवर्णसंधी! वाचा आज काय आहे प्रति तोळा सोन्याचा भाव

Gold Price Today: सोनेखरेदीची सुवर्णसंधी! वाचा आज काय आहे प्रति तोळा सोन्याचा भाव

Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये आज पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळते आहे. तुम्ही जर सोनेखरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 17 जुलै: सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold Price Today) आज पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली आहे. अशावेळी तुम्ही सोनंचांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Rates) 47,340 रुपये प्रति तोळा आहे. याशिवाय आज चांदीच्या दरातही (Silver Price Today) घसरण पाहायला मिळाली आहे. इथे तपासा सोन्याचे आजचे दर (Gold Price Today, 17 July 2021) दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,410 रुपये प्रति तोळा आहे, मुंबईमध्ये दर 47,340 रुपये प्रति तोळा आहे. चेन्नई आणि कोलकातामध्ये दर अनुक्रमे 45,420 रुपये आणि 47,660 रुपये प्रति तोळा आहे. याशिवाय 24 कॅरेट सोन्याबाबत बोलायचे झाले तर दिल्लीमध्ये 51,710 रुपये, मुंबईमध्ये 48,340 रुपये, चेन्नईमध्ये 49,550 रुपये आणि कोलकातामध्ये 49,760 रुपये प्रति तोळा आहे. चांदीचे आजचे दर (Silver Price Today, 17 July 2021) दिल्ली- 68,400 रुपये प्रति 1 किलोग्रॅम मुंबई- 68,400 रुपये प्रति 1 किलोग्रॅम हे वाचा-Master Card Ban मुळे बँकांमध्ये तणाव! SBI, Axisसह 5 बँका होणार प्रभावित चेन्नई- 73,200 रुपये प्रति 1 किलोग्रॅम कोलकाता- 68,400 रुपये प्रति 1 किलोग्रॅम कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल हे वाचा-HDFC Alert! उद्या 6 तास बंद असणार या बँक सेवा; आजच पूर्ण करा महत्त्वाची कामं गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये एमसीएक्सवर (Gold Rates on MCX) सोन्याचे भाव 56200 रुपये प्रति तोळाच्या आसपास होते. हा दर आतापर्यंतचा सर्वोच्च (Gold Rates on Record High) आहे. तर आज गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर 47,340 रुपये प्रति तोळावर आहे. अर्थात आज सोन्याचे दर प्रति तोळा साधारण 9000 रुपयांनी स्वस्त आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: